लॉकडाऊनच्या काळात गोळ्या न मिळाल्याने बिघडली मानसिकता अन् संपवली जीवनयात्राच.....

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मे 2020

दूधगंगा पुलावरुन उडी घेऊन..चाँद शिरदवाडच्या एकाची आत्महत्या..

बेडकिहाळ (बेळगाव) : चाँद  शिरदवाड (ता. निपाणी)
येथील एकाने मानसिक अस्वस्थतेतून दूधगंगा नदीच्या पुलावरुन उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज  सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास घडली. राजू उत्तम कांबळे असे मयताचे नाव आहे. सदलगा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

हेही वाचा- देशसेवा करणारे फाैजी द्राक्ष बागेतच झाले क्वारंटाईन

या बाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,

राजू कांबळे यांची मानसिक स्थिती चांगली नव्हती. सध्या त्यांच्या औषधे व गोळ्या संपल्या होत्या. लॉकडाउनच्या काळात गोळ्या न मिळाल्याने त्यांची मानसिक अस्वस्थता वाढली होती. त्याच नैराश्यातून त्यांनी दूधगंगा नदीच्या पुलावरुन उडी घेऊन आपले जीवन संपविले.ते शिरोळ येथे दत्त शेतकरी साखर कारखान्यात सेवेत होते.सदलगा पोलिस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद झाली आहे. घटनास्थळी ठाण्याचे एएसआय एस. एस. पाटील, एस. बी. वाघमारे, एस. एच. इरगार व  एन. बी. बजंत्री यांनी उपस्थित राहून शोध कार्य केले.

हेही वाचा- जिल्ह्याच्या हितासाठी आम्ही उद्रेकाच्या उंबरठ्यावर  : नितेश राणेंचा इशारा ..

तर सदलगा अग्निशामक दलाच्या जवानांनीही सुमारे दोन तासावर मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न केले. दुपारी  ४ वाजण्याच्या सुमारास  राजू कांबळे यांचा मृतदेह सापडला. त्यानंतर तो उत्तरीय तपासणीसाठी सदलगा येथील सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आला. सायंकाळी उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.मयत राजू कांबळे यांच्या मागे  आई, वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. घटनास्थळी चाँद शिरदवाडचे अण्णा पाटील, संदीप शिंगे, किरण कांबळे, चाँद मुल्ला, विक्रम शिंगाडे, संपत बोरगल व  व युवक उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one person Dudhganga bridge One of Chand Shiradwad suicide