हिरण्यकेशीतून नूलचा एकजण गेला वाहून

अजित माद्याळे
रविवार, 19 ऑगस्ट 2018

गडहिंग्लज - हेब्बाळ कसबा नूल (ता गडहिंग्लज) येथील चंद्रशेखर शिवपुत्र पुजारी (42) हा हिरण्यकेशी नदीतुन वाहून गेला. आज दुपारी ही घटना घडली.

गडहिंग्लज - हेब्बाळ कसबा नूल (ता गडहिंग्लज) येथील चंद्रशेखर शिवपुत्र पुजारी (42) हे हिरण्यकेशी नदीतुन वाहून गेले आहेत. आज दुपारी ही घटना घडली.

दरम्यान, पुजारी यांच्या शोधात गडहिंग्लज पालिकेचे आपत्कालीन पथक बोटीसह घटनास्थळी पोहचले असून 3 तास शोध घेऊनही पुजारी सापडलेले नाहीत. पुजारी हे नेहमीप्रमाणे गवत आणण्यासाठी शेताकडे गेले होते. नदी काठालाच त्याची शेती आहे. गवत कापून त्याचा भारा त्यांनी नदीच्या पाण्यात टाकला. पाण्याच्या प्रवाहाबरोबर भारा ढकलत नदी घाटकडे ते येत होते. परंतु पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने  व त्यांची ताकत कमी पडल्याने पुजारी नदीतून वाहून गेले. त्याच्या सोबतीला असलेले काही शेतकरी काठावर आल्यानंतर ही घटना निदर्शनास आली. त्यानंतर गडहिंग्लज पालिकेचे आपत्कालीन पथकाला पाचारण केले. हेब्बाळ ते खणदाळ पर्यंतच्या नदीपात्रात शोध घेतला पण पुजारी सापडलेले नाहीत. 

Web Title: one went in flow of Hirnaykeshi River