कऱ्हाड: खंडणीच्या गुन्ह्याबद्दल एक वर्षाची कैद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

तत्कालीन फौजदार अमोल कोंडे यांनी त्याचा तपास केला. त्यात सेजारील दुकानदारांची साक्ष व अन्य साक्षीदार, सरकारी वकील एन. बी. गुंडे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून त्यास एक वर्षाची शिक्षा ठोठावली. त्यात वारे याला खंडणी मागणे, दुकानची मोडतोड करणे, महिलेवर हल्ला करणे अशा सगल्याच कलमात दोषी धरले आहे.

कऱ्हाड : खंडणीच्या गुन्ह्यात शिक्षा होवून जामीनावर बाहेर आलेल्या संशयिताने पुन्हा खंडणीचाच गुन्हा केल्याबद्दल त्याला येथील फौजदारी न्यायाधीश आर. टी. घोगले यांनी एक वर्षाची कैद व एक हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

विशाल रविंद्र वारे (रा. बुधवार पेठ) अशे संबधिताचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वीच ही घटना बुधावर पेठेत घडली होती. वारेने खंडणीसाठी दुकानची मोडतोड केली होती. त्यातील काचेने संबधित दुकान मालकीन साजीदा नफीसा खान यांच्यावर वारही केला. येथील टाऊन हॉल परिसरात गाळ्यामध्ये डॉ. जयवंत पवार यांच्या क्लिनीकमध्ये जावून वारे याने असाच प्रकार केला होता. तो प्रकार 5 जानेवारी 2017 रोजी घडला होता. त्यावेळी डॉ. पवरा यांना धमकी देवून वारे याने एक हजारांची खंडणी मागितली होती. त्याबाबत डॉ. पवार यांनी त्याची फिर्याद शहर पोलिसात दिली होती. त्यानुसार त्या गुन्ह्यात त्याला तीमन महिन्यांच्या कैदेची शिक्षा झाली होती. त्याच गुन्ह्यात जामीनावर बाहेर असताना वारे याने पुन्हा खंडणीचा गुन्हा केला. बुधवार पेठेतील साजीदा खान यांच्या दुकानात तो शिरला. त्याने एख हजार रूपये व जरकीन मागितले. ते देण्यास नकार दिल्याने त्यांनी खान यांच्या दुकानच्या काऊन्टरची मोडतोड केली. त्याच्या काचाही फोडल्या. त्याच काचेच्या तुकड्याने साजीदा यांच्यावर वार केला. त्याबाबत पोलिसांनी त्यांला अटक केली.

तत्कालीन फौजदार अमोल कोंडे यांनी त्याचा तपास केला. त्यात सेजारील दुकानदारांची साक्ष व अन्य साक्षीदार, सरकारी वकील एन. बी. गुंडे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून त्यास एक वर्षाची शिक्षा ठोठावली. त्यात वारे याला खंडणी मागणे, दुकानची मोडतोड करणे, महिलेवर हल्ला करणे अशा सगल्याच कलमात दोषी धरले आहे.

Web Title: one year jail for ransom case in Karhad