मुलीचं प्रियकराशी लग्न होऊ नये म्हणून 'अघोरी कृत्य'; स्मशानभूमीत पुरला मुलाचा फोटो, भोंदूबाबासह तिघांविरुद्ध गुन्हा

राहुल पोवारचे एका मुलीशी दीड वर्षापासून प्रेमसंबंध होते.
Ajara Police Station
Ajara Police Station esakal
Updated on
Summary

कोवाडे मार्गावर मरगूबाई मंदिरालगतच्या जंगलात जादूटोण्याचे साहित्य झाडाला टांगल्याचे दिसले.

आजरा : आजऱ्यातील एका युवकाचे आपल्या मुलीशी लग्न (Marriage) होऊ नये म्हणून जादूटोणा व अघोरी प्रकाराचा अवलंब केल्याप्रकरणी आजरा पोलिसात (Ajara Police Station) भोंदूबाबासह तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. भोंदूबाबा व रेश्मा बुगडे, शामराव बुगडे (रा. मलिग्रे, ता. आजरा) सुनील निऊंगरे कागिनवाडी (ता. आजरा) अशी त्यांची नावे आहेत.

Ajara Police Station
Kolhapur Crime : धक्कादायक! दारूसाठी पोटच्या पोरानं घोटला आईचा गळा; चेहऱ्यावर जखमा, कानातून आलं रक्त

राहुल पोवार यांने आजरा पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे, की राहुल पोवारचे एका मुलीशी दीड वर्षापासून प्रेमसंबंध होते. संबंधित मुलीला राहुलच्या नातेवाईकांनी लग्नासाठी मागणी घातली होती. मात्र, त्याला नकार दिला. काहीतरी कामधंदा कर मग लग्नाचे बघू असे सांगितले.

Ajara Police Station
Kunbi Certificate : वाळवा, शिराळ्यात सर्वाधिक कुणबी नोंदी; दुष्काळी तालुक्यांत नोंदीच नाहीत, शासनाला करणार अहवाल सादर

दरम्यान, सुनील निउंगरे हे एका भोंदूबाबाच्या मदतीने जादूटोण्याचा प्रकार करू लागले. त्याचाच एक भाग म्हणून २९ सप्टेंबरला रात्री ९.३० वाजता गावातील स्मशानभूमीत जाऊन काहीतरी पुरल्याचे फिर्यादीच्या मित्रांनी राहुलला सांगितले. राहुलने स्मशानभूमीत जाऊन पाहिल्यावर संबंधित युवती व स्वतःचा फोटो, जादूटोण्याचे साहित्य ठेवल्याचे दिसले.

Ajara Police Station
Karnataka Politics : कर्नाटकातील काँग्रेस सरकार कोसळणार? मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, पाच वर्षे मीच..

त्यानंतर पुन्हा २८ आक्टोबरला रात्री ८ वाजता कोवाडे मार्गावर मरगूबाई मंदिरालगतच्या जंगलात जादूटोण्याचे साहित्य झाडाला टांगल्याचे दिसले. यावर पोवार यांने आजरा पोलिसात जाऊन संबंधितावर तक्रार दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ramtirth Waterfall Ajara after heavy rainfall
Yavatmal fake marriage case
Marriage Fraud
Kandivali Metro Station girl Molestation case
Marathi News Esakal
www.esakal.com