मोहोळ येथे तरुण मुलाचा बुडून मृत्यु

राजकुमार शहा 
गुरुवार, 24 मे 2018

दुपारी 1 वाजता पोहता पोहता इतर सहकाऱ्यांना दिसेनासा झाला. त्यांनी आरडाओरड करून इतर नातेवाईकांना ही माहीती दिली.

मोहोळ - विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या एका 17 वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची घटना अंकोली ता. मोहोळ येथे बुधवारी दुपारी 1 वाजता घडली. राहुल संभाजी उगले रा. शेजबाभुळगाव असे मृताचे नाव आहे.
 
मोहोळ पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत राहुल हा त्याच्या मित्रासोबत अंकोली येथील बाजीराव पवार यांच्या शेतातील विहीरीत पोहण्यासाठी गेला होता. दुपारी 1 वाजता पोहता पोहता इतर सहकाऱ्यांना दिसेनासा झाला. त्यांनी आरडाओरड करून इतर नातेवाईकांना ही माहीती दिली. त्यांनी शोधाशोध केली. परिसरातील अट्टल पोहणारे बोलविले. पण विहीर खोल असल्याने राहुल सापडला नाही. 

दरम्यान त्याच्या नातेवाईकांनी पुणे येथील रिस्क्यु पथकाला पाचारण केले. पथक आल्यावर त्याला रात्री उशीरा पाण्याबाहेर काढण्यास यश आले. राहुल हा शाळेत अत्यंत हुशार विद्यार्थी होता तर तो उतम खेळाडु होता. त्याच्या निधनाने शेजबाभुळगावावर शोककळा पसरली. 

या घटनेची खबर कृष्णात तानाजी उगले रा. शेजबाभुळगाव यांनी मोहोळ पोलिसात दिली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: One Young Boy Died Because Of drowning

टॅग्स