कांदा उत्पादकांना अनुदान

Onion
Onion

कोल्हापूर - गतवर्षाच्या अखेरीस कांद्याचे दर घसरल्याने उत्पादक शेतकऱ्याला रुपया किलोने कांदा विकण्याची वेळ आली होती. या शेतकऱ्यांना मदत म्हणून क्‍विंटलला २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार सरकारकडून हे अनुदान बुधवारी (ता. २७) संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. अनुदानाची ही रक्‍कम १ कोटी २९  लाख ६९ हजार आहे.
गतवर्षी १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळात कांद्याचे दर चांगलेच घसरले.

कांदा उत्पादकाला रुपया किलोने कांदा विकण्याची वेळ आली होती. या कालावधीत कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत २१२५ शेतकऱ्यांनी ६४ हजार ८६७ क्‍विंटल कांद्याची विक्री केली होती. तर वडगाव बाजार समितीत ७६ शेतकऱ्यांनी २६०० क्‍विंटल कांद्याची विक्री केली होती. या शेतकऱ्यांना सरकारकडून प्रतिक्‍विंटल २०० रुपयेप्रमाणे १ कोटी २९ लाख ६९ हजारांचे अनुदान वाटप केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील आवळी येथील मारुती चांगदेव भोसले या कांदा उत्पादकाला ४० हजार अनुदान मिळाले आहे. तर याच जिल्ह्यातील सखाराम अर्जुन म्हमाने या शेतकऱ्याला ८०० रुपयांचे अनुदान मिळाले आहे. अनुदानाची रक्‍कम जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे व कार्यालय अधीक्षक कृष्णात ठाकरे यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यास सुरुवात केली.

डिसेंबर २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. ७०० शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यांची छाननी करून अनुदानाची रक्‍कम जमा करण्यात येईल.
- अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com