कांदा अनुदानाचे चारशे कोटी अडकले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांना उत्पादनाच्या तुलनेत खर्च परवडत नसल्याने सरकारने प्रतिक्‍विंटल दोनशे रुपयांचे अनुदान जाहीर केले. पहिल्या टप्प्यातील अनुदान मिळाले; परंतु आता राज्यातील चार लाख ९३ हजार २२८ शेतकऱ्यांचे ३९३ कोटी ३२ लाख रुपयांचे अनुदान आचारसंहितेमुळे अडकले आहे.

सोलापूर  - कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांना उत्पादनाच्या तुलनेत खर्च परवडत नसल्याने सरकारने प्रतिक्‍विंटल दोनशे रुपयांचे अनुदान जाहीर केले. पहिल्या टप्प्यातील अनुदान मिळाले; परंतु आता राज्यातील चार लाख ९३ हजार २२८ शेतकऱ्यांचे ३९३ कोटी ३२ लाख रुपयांचे अनुदान आचारसंहितेमुळे अडकले आहे. सद्यःस्थितीत बाजार समिती स्तरावर अर्जांची छाननी आणि लेखापरीक्षण सुरू असल्याचे पणन विभागातील सूत्रांनी सांगितले. 

पावसाअभावी रब्बी व खरीप हंगामा वाया गेला. शेतमालाचे भाव स्थिर नाहीत. कांद्याला यंदा प्रतिक्‍विंटल तीनशे ते दोन हजारांपर्यंतच भाव मिळाला.

उत्पादनाचा खर्च आणि मिळणारा भाव यामध्ये तफावत असल्याने शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, तीन टप्प्यांत अनुदानासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागवून घेतल्याने त्यासाठी विलंब लागला. पणन विभागाच्या वतीने १५ एप्रिलपर्यंत अनुदानाचा प्रस्ताव सरकारला सादर केला जाणार होता. मात्र, बाजार समित्यांकडून लेखापरीक्षण, छाननीची प्रक्रिया निवडणुकीमुळे लांबणीवर पडली. लेखापरीक्षणानंतर प्रस्ताव पणन विभागाला, तर पणन विभागाकडून सरकारला सादर केला जाणार आहे.

Web Title: Onion Subsidy 400 Crore Payment Balance Farmer