राज्यात सोयाबीनसाठी 107 केंद्रावर ऑनलाइन नोंदणी 

राज्यात सोयाबीनसाठी 107 केंद्रावर ऑनलाइन नोंदणी 

सोलापूर- राज्यात सोयाबीन या खरीप हंगामातील पिकाची काढणी आता सुरू झाली आहे. त्यामुळे हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पणन विभागाच्यावतीने राज्यातील 107 केंद्रावर शेतकऱ्यांची माहिती ऑनलाइनला भरण्यास सुरवात केली आहे. येत्या 15 ऑक्‍टोबरपासून हमीभाव केंद्र सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

सोयाबीनची काढणी जरी सुरू झाली असली तरी शेतकऱ्यांनी एक आठवडा हमीभाव केंद्र सुरू होण्याची वाटप पाहण्याचे आवाहन पणन विभागातील अधिकारी करत आहेत. 25 सप्टेंबरपासून हमीभावासाठी ऑनलाइन माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याठिकाणी शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे नेऊन मालाची ऑनलाइन नोंदणी करणे आवश्‍यक आहे. 

सध्या बाजारामध्ये सोयाबीन विक्रीसाठी घेऊन गेल्यास शेतकऱ्यांचा माल हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केला जात आहे. एवढेच नाही तर विक्री केलेल्या मालाची पावतीही शेतकऱ्यांना दिली जात नाही. शेतकऱ्यांनी पावतीची मागणी केल्यास आमच्याकडे मालच टाकू नका, असेही अडते शेतकऱ्यांना बजावू लागले आहेत. त्यामुळे हमीभावाची मागणी केल्यास मालच विकणार नाही अशी भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. अडत्यांकडून मालाची साठेबाजी केली जात आहे. हमीभाव केंद्र सुरु झाल्यानंतर हाच माल त्या केंद्रावर जाण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. 

ऑइल मिलचा भाव 3200 रुपये 
सोयाबीनपासून तेल काढण्याच्या अनेक मिल राज्यामध्ये आहेत. त्यांनीही सध्या सोयाबीनची खरेदी सुरू केली आहे. ऑइल मिलशी संपर्क साधला असता तीन हजार ते तीन हजार 200 रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीनची खरेदी सुरू असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. 

आकडे बोलतात 
-सोयाबीनचा हमीभाव-3399 रुपये प्रतिक्विंटल 
-बाजारात मिळणारा भाव-2700 ते 2900 रुपये प्रतिक्विंटल 
-एका मजुराची मजुरी-350 रुपये 
-एका पोत्याची भरडाई-140 रुपये 
-राज्यात मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून 84 हमीभाव केंद्र 
-इतर सोसायट्यांच्या माध्यमातून 23 हमीभाव खरेदी केंद्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com