केवळ 144 रुपयांत रोज दोन जीबी डेटा! 

सिद्धार्थ लाटकर
शुक्रवार, 8 जून 2018

सातारा - रामदेव बाबा यांनी भारत संचार निगम लिमिटेडबरोबर संयुक्तरीत्या "पतंजली बीएसएनएल सिमकार्ड' बाजारात आणले आहे. केवळ 144 रुपयांमध्ये देशभर अमर्यादित व्हॉईस कॉल्स, प्रतिदिन दोन जीबी इंटरनेट डेटा आणि 100 एसएमएसची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे. दूरसंचार क्षेत्रात आतापर्यंत कमी पैशात मोठ्या प्रमाणात सुविधा देणारी योजना बाजारात आली नव्हती असा दावा "बीएसएनएल'द्वारे करण्यात येत आहे. 

"बीएसएनएल'ने काही दिवसांपूर्वी "पतंजली बीएसएनएल' योजनेअंतर्गंत हरिद्वार येथे बीएसएनएल आणि पतंजली संघटनेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत या योजनेची मुहूर्तमेढ रोवली. पतंजली बीएसएनएल योजनेत देशभर अमर्यादित कॉल्स, प्रतिदिन दोन जीबी डेटा आणि 100 एसएमएसची सुविधा आणि विनामूल्य पतंजली पीआरबीटी योजना उपलब्ध आहे. ही योजना तीन प्रकारांत उपलब्ध करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मिळणारे प्रीपेड स्वरूपाचे सिमकार्डला 144 रुपयांत 30 दिवस, 792 रुपयांत 365 दिवस, 1584 रुपयांत 365 दिवसांची वैधता मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी भारत स्वाभिमान न्यास (ट्रस्ट) योग समिती, महिला पतंजली, युवा भारत आणि पतंजली किसान सेवा पतंजली संघटनेचे सदस्य या नियतकालिकाच्या सदस्यांचा सदस्यत्वाच्या आधारावर पात्र ठरणार आहेत. पतंजली संस्थेचे कर्मचारी त्यांच्या योग्यता कार्डाच्या आधारे पात्र ठरणार आहेत. याबरोबरच स्वदेशी समृद्धी कार्डधारकदेखील या योजनेसाठी पात्र आहेत. पतंजलीने स्वदेशी समृद्धी कार्ड सुरू केले आहे. ज्यामध्ये पतंजलीच्या उत्पादनांच्या खरेदीवर धारकांना दहा टक्के सवलत मिळणार आहे, तसेच कार्डधारकांना पाच लाख रुपयांचे जीवन विमा आणि सहा महिने कमीतकमी सहा हजार रुपयांच्या खरेदीवर अडीच लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे. कोणतीही पतंजली संघटनाचा सदस्य नसलेल्या कोणीही स्वदेशी समृद्धी कार्डची सदस्यता घेऊ शकतात आणि त्यांना बीएसएनएल योजनेवर जाण्याची संधी प्राप्त होऊ शकते. खासगी दूरसंचार क्षेत्राला पतंजली बीएसएनएल योजना टक्कर देईल, असा विश्‍वास "बीएसएनएल'ला वाटतो.

Web Title: Only two GB data per day at 144 rupees

टॅग्स