भारताचा ध्वज फडकवुन निवृत्त पोलिस आधिकाऱ्याची स्वतंत्र दिनाला सलामी 

वसंत कांबळे 
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

कुर्डू (सोलापूर)  : लऊळ (ता. माढा) येथील निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांने भारताच्या स्वतंत्र दिनी सौदेअरेबिया येथील मक्का या पवित्र ठिकाणी भारतदेशाचा तिरंगा झेंडा फडकावून परदेशातून स्वतंत्र दिनाची सलामी दिली आहे. 

कुर्डू (सोलापूर)  : लऊळ (ता. माढा) येथील निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांने भारताच्या स्वतंत्र दिनी सौदेअरेबिया येथील मक्का या पवित्र ठिकाणी भारतदेशाचा तिरंगा झेंडा फडकावून परदेशातून स्वतंत्र दिनाची सलामी दिली आहे. 

सध्या पवित्र मक्का येथे सध्या हजयात्रा सुरू आहे. या हज यात्रेदरम्यान भारताचा स्वातंत्र्यदिन आला होता. याचे औचित्य साधत लऊळ येथील निवृत्त पोलिस आधिकारी मोहम्मद गुलाब पठाण यांनी देशभक्ती दाखवत हज यात्रेमध्ये तिरंगा फडकावला आहे. सोशल मीडियावर सध्या या दांपत्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र पोलिस दलातून सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मोहम्मद पठाण आणि त्यांच्या पत्नी रुकसानबेगम यांनी हज यात्रेमध्ये स्वातंत्र्य दिनी तिंरगा फडकवत लाखो भाविकांचे लक्ष वेधले.

या पवित्र हज यात्रेसाठी हजारो भारतीय मुस्लीम भाविक तीर्थक्षेत्र मक्का येथे गेले आहेत.  हज यात्रेदरम्यान भारतीय स्वातंत्र्य वर्धापनदिनाचे औचित्य साधून मोहम्मद गुलाब पठाण यांनी तिरंगा फडकावला.  पठाण यांनी हज यात्रेमध्ये भारतीय तिरंगा ध्वज हातात घेऊन भारतीय स्वातंत्र्य दिनाचा आनंद लुटला. सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मोहम्मद पठाण यांनी लाखो भाविकांच्या गर्दीत हातात तिरंगा ध्वज घेऊन काबाला प्रदक्षिणा घातली. यावेळी त्यांनी उपस्थीत असलेल्या सर्वच भाविकांचे लक्ष वेधले आणि भारतीय असल्याचा अभिमान व्यक्त केला.

 मोहम्मद पठाण यांनी ३२ वर्षे महाराष्ट्र पोलिसांत सेवा बजावले आहे. नांदेड येथे असताना सात वर्षापूर्वी पोलीस निरीक्षक म्हणून पठाण यांनी निवृत्त स्विकारली.  ते सध्या लऊळ येथे उत्कृष्ठ शेती करत आहेत. त्यांची ही दुसरी हज यात्रा आहे.सोशल मीडियावर  पठाण दाम्पत्यांचे कौतुक केले होत असुन, प्रत्येकजण आपल्या भावना व्यक्त करत आहे. अभिमान आहे भारतीय असल्याचा,परदेशात तिरंगा ध्वज घेऊन मातृप्रेम दाखवणाऱ्या मुस्लिम बांधवांचा अभिमान आहे. असल्याचे अनेक व्यक्तीने म्हटले आहे

Web Title: Opening the flag of India, the retired police officer opens the Independent Day