आगामी विधानसभा निवडणुकीत 33 टक्‍के महिलांना संधी : रहाटकर

BJP_Logo
BJP_Logo

सोलापूर : केंद्रात सध्या भारती जनता पक्षाच्या 41 महिला खासदार असून महाराष्ट्रात पार पडणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत 33 टक्‍के महिलांना संधी देण्यात येईल, असे प्रतिपादन विजया रहाटकर यांनी सोलापुरात केले.

भाजप सदस्य नोंदणीच्या निमित्ताने विजया रहाटकर आज (शनिवार) सोलापुरात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या दृष्टीने भाजपने तयारी सुरु केली आहे. नव्याने भाजपचा सदस्य होणाऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या उज्ज्वला गॅस योजना, मुद्रा योजना, स्टार्टअप इंडिया, जनधन योजना यासह अन्य योजनांची माहिती दिली जात असल्याचेही रहाटकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश यासह देशातील 18 राज्यातील सत्ता स्थापण्यात महिलांचा निर्णायक वाटा राहील. जगातील सर्वात मोठा पक्ष हा भाजप ठरला असून त्याची सद्यस्थितीत 11 कोटी सभासद नोंदणी झाली आहेत. यावर्षी 14 कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट असून वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, तर तेलंगणातून गृहमंत्री अमित शहा यांनी सदस्य नोंदणी अभियानला सुरुवात केली. डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा सदस्य नोंदणीचा कार्यक्रम भाजपने हाती घेतल्याचे रहाटकर यांनी या वेळी सांगितले. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकांपूर्वी अधिकाधिक लोकांपर्यंत जाण्याच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वपूर्ण असून त्यामध्ये महिलांचा 25 टक्‍के वाटा आहे.

तत्पूर्वी, त्यांनी सोलापुरातील मुस्लीम बहुल परिसरात सदस्य नोंदणीचा कार्यक्रम घेतला. या वेळी महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, सोलापुरच्या प्रभारी उमा खापरे, नगरसेविका इंदिरा कुडक्‍याल, संगीता जाधव, मोहिनी पत्की, अनुजा कुलकर्णी, मिनाक्षी पाटील, शोभा नष्टे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com