सर्व कारभाऱ्यांना समान संधी देण्याचा प्रयत्न ; विविध समित्यांवर वीस जण

opportunity of work to all corporates for same in sangli corporation
opportunity of work to all corporates for same in sangli corporation

विटा (सांगली) : नगरपालिका निवडणुकीला अजूनही अवधी असला तरी पालिका सत्तेत गेल्या साडेचार वर्षांत सहा नगरसेवकांना उपनगराध्यक्षपदी काम करण्याची संधी सत्ताधारी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. सन २०१६ ला नगरपालिकेची निवडणूक झाली. त्यात तेवीस  नगरसेवक व थेट  नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ॲड. वैभव पाटील यांच्या पत्नी  प्रतिभा पाटील निवडून आल्या, तर विरोधी शिवसेनेचे दोन नगरसेवक निवडून आले.

पहिल्या वर्षी नगरसेवक किरण तारळेकर,  दुसऱ्या वर्षी प्रतिभा चोथे यांना, तर सहा-सहा महिने दहावीर शितोळे, संजय तारळेकर व  त्यानंतर अजित गायकवाड यांना संधी देण्यात आली. गायकवाड यांनी राजीनामा दिल्यानंतर सध्या सारिका सपकाळ यांना संधी देण्यात आली आहे. उपनगराध्यक्षपदाच्या संधीबरोबर पालिकेतील विविध समित्यांवर वीस नगरसेवकांना सभापतीपदे देऊन काम करण्याची संधी  माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे या सर्वांना पालिकेतील कामाचा अनुभव घेता आला. समाजातील प्रत्येक घटकाला पालिका सत्तेत काम करण्याची संधी नगरसेवकाच्या रूपाने मिळाली.

भाजपचे शहराध्यक्ष अनिल म. बाबर, रवींद्र कदम, महेश कदम, सिद्राम बुचडे  यांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी देण्यात आली. सध्या आपआपल्या प्रभागात नगरसेवकांनी नागरिकांना नागरी सुविधा देण्यावर भर दिला आहे, तर मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. नगरपालिका निवडणुकीत माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्याबरोबर असणारे स्वीकृत नगरसेवक अनिल म. बाबर हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांच्या गटात सामील झाले आहेत, तर स्वीकृत नगरसेवक सिद्राम बुचडे यांनी दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत त्यांची भूमिका काय असणार, हा प्रश्न आहे. एकंदरीत नगरसेवकांना विविध पदांच्या रूपाने काम करण्याची संधी देऊन येणारी निवडणूक सुकर करण्याचा प्रयत्न माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी केला आहे. 

अशोक गायकवाड यांचा समझोता एक्‍स्प्रेस

 गत पालिका निवडणुकीत अशोक गायकवाड व माजी आमदार सदाशिवराव पाटील एकत्र लढले. गायकवाड यांचे पुत्र अजित गायकवाड नगरसेवक झाले. त्यांना पाटील यांनी उपनगराध्यक्षपदाची संधी दिली, तर गायकवाड यांचे पुतणे सुमित गायकवाड यांनाही स्वीकृत नगरसेवकपदी संधी देण्यात आली. अद्याप तरी गायकवाड व पाटील यांचा समझोता एक्‍स्प्रेस टिकून आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com