दुसऱ्या अखिल भारतीय पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन

karad
karad

कऱ्हाड : देशभरातील पक्षतज्ञांसह अभ्यासकांच्या सहभागातून येथे दोन दिवसांचे दुसरे अखिल भारतीय व 32 व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन केले आहे.येत्या 23 व 24 नोव्हेंबरला त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती जिमनखान्याचे सचिव सुधीर एकांडे यांनी दिली. यावेळी जिमखान्याचे अध्यक्ष महेंद्रकुमारे शाह, संमेलनाचे कार्याध्यभ रोहन भाटे, निसर्ग विभाग प्रमुख नाना खामकर उपस्थित होते. 

एकांडे म्हणाले यापूर्वी जिमखानातर्फेच पहिले अखील बारतीय सत्रावरील पक्षीमित्र संमेलन 1998 मध्ये येथे पार पडले होते. त्यावेळी ते महाराष्ट्राचे सोळावे संमेलन होते. याही वर्षी अखील बारतीय स्तारवारील दुसरे व राज्य पातळीवरील 32 वे पक्षीमित्र संमेलनाचे येथे होत आहे. त्यात महाराष्ट्र पक्षीमित्रतर्फे होणाऱ्या संमेलनात जिमखान्यासह शासनाच्या नागपूरचे जैवविविधाता मंडळ, जिल्ह्याचा वन विभाग व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांचाही त्यात सक्रीय सहभाग आहे. पश्चीम घाटातील जैव विविधता व तेथे असलेले पक्षी यांचा अभ्यास जगासमोर यावा व तेथील महत्व लोकांना कळावे यानिमित्ताने संमलेन होत आहे. संमेलनात पक्षी, निसर्ग जतन व संवर्धन विषयावर विविध नामवंतांची व्याख्याने, पक्षी अभ्यासक, निरीक्षकांची चर्चासत्रे, प्रकट मुलाखत, स्लाईड शोड, फिल्म शो, छायाचित्र प्रदर्शन व स्पर्धा या बरोबरच प्रबंध सादरीकरण अशा भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.

भाटे म्हणाले, संमेलनाचे उद्घाटन वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, उपसंचालक डॉ. विनिता व्यास, उपवनसंरक्षक सातारा डॉ. भारतसिंह हाडा, जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा सदस्य सचिव राज्य जैवविविधता मंडळाचे अश्रफ अहमद व राज्य पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांच्या उपस्थीतीत होणार आहे. दोन दिवसांच्या संमेलनात विविध चर्चासत्रात, परिसंवादात, प्रबंध सादरीकरण व प्रकट मुलाखत होणार आहेत. संमेलनाच्या निमित्ताने निसर्ग, पर्यावरण व पक्षी या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्र स्पर्धा होत आहे. त्यात सर्वोत्कृष्ठ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. शालेय स्तरावर विषयावर चित्रकला व सुंदर हस्ताक्षर स्पर्धां होणार आहेत. गुणवत्ता प्राप्त छायाचित्रे, चित्रकला व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांच्या उत्तम कलेचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. विविध देशातील पोस्टाच्या तिकीटावरील व नाण्यांवरील पक्षांची छबी तिकिटांचे व नाण्यांचे परदर्शन भरविण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com