इंदापूरमध्ये मोफत कॅन्सर पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन

राजकुमार थोरात
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

वालचंदनगर - पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शुक्रवार (ता. १९) रोजी इंदापूर शहरामध्ये स्वर्गीय आर. आर. पाटील कॅन्सरमुक्त अभियानातंर्गत कॅन्सर पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली.

या शिबिराचे आयोजन इंदापूर शहरातील शहा सांस्कृतिक भवनामध्ये शुक्रवार (ता.१९)रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले आहे. शिबिरावे उद्घघाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यासंदर्भात माने यांनी सांगितले की,ग्रामीण भागातील नागरिकांना कॅन्सर पूर्व तपासणी करण्यासाठी शहरी भागामध्ये जावे लागते. तसेच हजारो रुपयांचा खर्चही करावा लागतो. खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतुन ग्रामीण भागामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून मुख, गर्भाशय, ब्रेस्टच्या कॅन्सर पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन मोफत करण्यात येणार आहे. या शिबिराचे इंदापूर व आजुबाजुच्या तालुक्यातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन माने यांनी केले आहे. या शिबिराला आमदार दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Organizing a free cancer pre-screening camp in Indapur