गदिमा स्मारकात गदिमा जयंतीनिमित्त पारावरील साहित्यिकांच्या मेळाव्याचे आयोजन

aatpadi
aatpadi

आटपाडी - ग.दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष अखेर त्यांच्या जन्मभूमीतील अर्धवट स्मारक पूर्ण करून भौतिक सुविधेबरोबरच वैचारिक सुविधाही उभा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही आमदार अनिल बाबर यांनी दिली. 

शेटफळे (ता. आटपाडी) येथे गदिमा स्मारकात गदिमा जयंतीनिमित्त पारावरील साहित्यिकांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री. बाबर बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. कृष्णा इंगवले होते. ग.दि. माडगूळकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन केले. यावेळी प्रा.संभाजी गायकवाड यांच्या 'चुकलेली पाऊले' कथासंग्रहाचे प्रकाशन केले. प्रास्ताविक प्रा. सी.पी. गायकवाड यांनी केले. 

आमदार श्री. बाबर म्हणाले, 'माणदेशाला विचारवंताचा खूप मोठा वारसा आहे. तोच वारसा आजच्या तरुण पिढीने जोपासला आहे. गदिमांची जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याच्या दृष्टीने कार्यक्रमांचे नियोजन करा. त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून लागणारे सर्व सहकार्य करण्यास कमी पडणार नाही. गदिमांची जन्मभूमी आणी कर्मभूमीला जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याची संधी मिळाली आहे. या वर्षात अर्धवट स्मारक पूर्ण होईल. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अर्थमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. आटपाडीतही नाट्यग्रह उभारणीसाठी प्रयत्न सुरू केलेत. दोन चार जागेची पाहणी केली आहे.डिसेंबर अखेर याला मूर्त स्वरूप येईल.' अध्यक्ष डॉ. इंगवले म्हणाले, 'शेटफळेतील पारावरील मेळाव्याला पंचवीस वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा पुढे चालू ठेवण्याचे काम तरुण पिढीवर आले आहे. अर्धवट स्मारकाचे उद्घाटन केले. अपूर्ण काम पूर्ण व्हावे हीच अपेक्षा आहे.' यावेळी प्रा. डॉ. सयाजीराजे मोकाशी, प्रा. संभाजी गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच रेश्मा शिरसागर, कवी ज्ञानेश डोंगरे, तानाजी वाघमारे, शाहीर हरिभाऊ गळवे, मेघा पाटील आदी उपस्थित होते. सुनील गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com