अन्यथा रविवारचा आठवडी बाजारही बंद ठेवू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

कोल्हापूर - ६ टक्के अडत रद्द करावी तसेच मोघम सौदे बंद करावेत, या मागणीसाठी किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी आज दुसऱ्या दिवशीही घाऊक भाजीपाला खरेदी करणे बंद ठेवले. परिणामी शहरातील भाजी मंडई आजही बंद राहिली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून भाजीपाला विक्रीस आला होता. तेवढ्यावर शहरवासीयांना आपली गरज भागवावी लागली. मागण्या मान्य न केल्यास येत्या रविवारी आठवडी बाजारही बंद ठेवण्याचा इशारा किरकोळ विक्रेत्यांनी दिला आहे. 

सहा टक्के अडत देण्यास किरकोळ व भाजीपाला विक्रेत्यांचा विरोध आहे. त्याबाबतचे निवेदन पणन मंत्र्यांकडे दिले आहे. सहा महिने झाले तरी त्यावर निर्णय झालेला नाही. शाहू मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मोघम सौदे करून बहुतांशी मालाची विक्री होते. यामुळे किरकोळ विक्रेत्यांना भाजीपाला पुरेशा प्रमाणात मिळत नाही. 

यामुळे भाजीपाला विक्रेत्यांचे नुकसान होते. या पार्श्‍वभूमीवर किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी शाहू मार्केट यार्डातून भाजीपाला खरेदी करणे बंद केले. काल गुरुवारी व आज शुक्रवारी भाजीपाला खरेदी झाली नाही. परिणामी भाजी मंडईत आज दुसऱ्या दिवशी भाजीपाला आला नाही.

शहरालगतच्या ग्रामीण भागातून भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांनी रस्त्याकडेला काही किंवा भाजी बाजार स्थळावर जेवढा भाजीपाला विक्री केला, तेवढाच माल ग्राहकांपर्यंत पोचला. यामुळे ग्राहकांची गैरसोय टळल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, किरकोळ भाजीपाला विक्रेता संघटनेतर्फे जिल्हाधिकारी अमित सैनी यांना निवेदन देण्यात आले. भाजीपाला विक्रेत्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा बेमुदत भाजीपाला विक्री बंद करू, असा इशाराही देण्यात आल्याचे विक्रेता संघटनेचे पिंटू आंबेकर यांनी सांगितले.

Web Title: Other Sunday off each week to keep markets

टॅग्स