'अन्यथा, भाजप विरोधात मतदान करु'

'अन्यथा, भाजप विरोधात मतदान करु'

पंढरपूर- मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान राज्य शासनाने कार्यकर्त्यांवर दाखल केलेले 7 हजार 792 गुन्हे मागे घ्यावेत. अन्यथा, लोकसभा निवडणूकीत भाजप विरोधात मतदान करु असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय रामभाऊ गायकवाड यांनी आज (ता.17) दिला. 

मराठा समाजाच्या प्रलंबीत मागण्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक पार पडली. बैठकीनंतर मराठा समाजाच्या समन्वयकांनी सरकार विरोधातील आपली भूमिका स्पष्ट केली.

लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी राज्य शासनाने दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत, आंदोलना दरम्यान हुतात्म्य  झालेल्या 42 तरुणांच्या कुटुंबांना 10 लाखाची मदत देऊन वारसांना शासकीय नोकरी द्यावी. अन्यथा, लोकसभा निवडणुूकीत मराठा समाज भाजपच्या कमळ चिन्हावरती बहिष्कार घालून विरोधी मतदान करेल. जर मागण्या पूर्ण केल्यानतर मराठा समाज भाजपच्या पाठिशी राहील असेही यावेळी गायकवाड यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com