अन्यथा ऑनलाईन महासभेवर बहिष्कार घालू...यांनी दिला इशारा

mahapalika.jpg
mahapalika.jpg

सांगली- कोरोनामुळे महापालिकेची स्थायी समिती बैठक तसेच महासभा ऑनलाईन घेण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र अशा सभेत अनेक सदस्यांना आपले विषय मांडता येत नाही. काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होत नाही. त्यामुळे ऑनलाईन सभेला विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी विरोध केला आहे. सोशल डिस्टन्स पाळून सभागृहात सभा घ्याव्यात अन्यथा महासभेवर बहिष्कार घालू, असा इशारा त्यांनी दिला आहे. 


महापालिकेची कोरोनाबाबत विशेष सभा ऑनलाईन झाली होती. त्यानंतर स्थायी समितीची सभाही ऑनलाईन झाली होती. परंतु या सभांच्या वेळी अनेक सदस्यांना आपले विषय मांडता आले नाहीत. काही विषयांवर सखोल चर्चा होण्याची गरज असताना तशी चर्चा झाली नाही. स्थायी समितीची बैठकही ऑनलाईन घेण्यात येणार आहे. त्याऐवजी ही सभा महापालिकेच्या वसंतदादा पाटील सभागृहात घेण्यास काय हरकत आहे. तेथे स्थायी समितीचे सदस्य सोशल डिस्टन्स पाळून सभेस उपस्थित राहू शकतात. शिवाय महापालिकेची महासभा एखाद्या मोठ्या सभागृहात घेतली जावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी केली. 


श्री. साखळकर म्हणाले,""स्थायी समितीच्या बैठकीत घनकचऱ्याचा 74 कोटींचा विषय आला आहे. अशा विषयावर ऑनलाईन सभेत चर्चा कशी करता येणार? हा विषय केवळ 74 कोटींचा नसून तो 110 कोटींपर्यंत जाणारा आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या विषयावर ऑनलाईन सभेत चर्चा होऊ शकणार नाही. अशा सभेत कुणाला बोलायची संधी द्यायची अन्‌ कुणाला नाही याचे अधिकार सभेच्या अध्यक्षांकडे असतात. त्यामुळे सविस्तर चर्चा होत नाही. महापालिका प्रशासनाने ऑनलाईन सभा घेऊ नयेत अशी आमची मागणी असून महासभा एखाद्या मोठ्या सभागृहात घ्यावी तेथे सोशल डिस्टन्स पाळून नगरसेवकांना उपस्थित राहता येईल. जर महासभा ऑनलाईन घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सभेवर बहिष्कार घालू, असा इशाराही विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी दिला.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com