दीड लाखांवर भाविक; दोन दिवसांत कोल्हापूर फुल्ल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

कोल्हापूर : सलग सुट्ट्यांमुळे दोन दिवसांत अंबाबाई मंदिरात दीड लाखांवर भाविकांनी भेट दिली. सलग दुसऱ्या दिवशी आजही गर्दीचा उच्चांक राहिला. दरम्यान, वाढत्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर देवस्थान समिती पदाधिकाऱ्यांनी मंदिरात भेट देऊन विविध सूचना केल्या. 

देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्या संगीता खाडे यांनी मंदिरात भेट दिली. 

कोल्हापूर : सलग सुट्ट्यांमुळे दोन दिवसांत अंबाबाई मंदिरात दीड लाखांवर भाविकांनी भेट दिली. सलग दुसऱ्या दिवशी आजही गर्दीचा उच्चांक राहिला. दरम्यान, वाढत्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर देवस्थान समिती पदाधिकाऱ्यांनी मंदिरात भेट देऊन विविध सूचना केल्या. 

देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्या संगीता खाडे यांनी मंदिरात भेट दिली. 

दर्शनमंडप वाढविणे, चारही दरवाजाच्या ठिकाणी पाण्याची सोय करणे, दर्शन मंडपात पंखे बसविणे, महापालिकेकडून खोदलेल्या पेव्हींग ब्लॉकवर मॅटींग टाकणे, मंदिराच्या बाहेरील बाजूस चप्पल स्टॅंड व लॉकर्सची संख्या वाढविणे, बाहेरील फेरीवाल्यांवर आळा बसावा, यासाठी वारंवार पोलिस व सुरक्षा रक्षकांना माहिती देण्याच्या सूचना केल्या. 

"सकाळ'च्या सूचना 
वाढत्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर मंदिरात कोणत्या सुविधा वाढवायला हव्यात, याबाबत आज "सकाळ'ने सूचना मांडल्या होत्या. देवस्थान समिती पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी मंदिर परिसराची पाहणी करून व्यवस्थापनाला विविध सूचना दिल्या. 

व्यवसाय चौपट 
अंबाबाई मंदिर परिसरातील विविध विक्रेत्यांकडे दोन दिवसांत इतर दिवसांच्या तुलनेत विविध वस्तूंची चौपट विक्री झाली आहे. खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरही गर्दी वाढली आहे. 

15 हजारांवर भाविकांनी घेतला लाभ 
महालक्ष्मी धर्मशाळेसह शहरातील यात्री निवास व हॉटेल्स हाऊसफुल्ल झाली. दोन दिवसांत पंधरा हजारांवर भाविकांनी महालक्ष्मी अन्नछत्राचा लाभ घेतला. 

वस्तुसंग्रहालयांत गर्दी 
शहरातील टाऊन हॉल, न्यू पॅलेस संग्रहालयातही पर्यटकांची गर्दी वाढली आहे. तुलनेत ही गर्दी पाच ते सहा पटीने वाढली असून एकट्या टाऊन हॉल संग्रहालयाला काल आठशेहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. 

सुरुवातीच्या काळात महालक्ष्मी भक्त मंडळ मंदिरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणार आहे. तालीम संस्था व मंडळांनाही देवस्थान समितीने पाण्याच्या व्यवस्थेबाबत आवाहन केले आहे. 
- राजू मेवेकरी, अध्यक्ष, महालक्ष्मी भक्त मंडळ 

पर्यटकांकडून कोल्हापुरी चपलांना मोठी मागणी आहे. काल आणि आज ही मागणी इतर दिवसांच्या तुलनेत चौपट वाढली. गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर विविध व्हरायटी उपलब्ध आहे. 
- महादेव ऱ्हाटणकर, चप्पल व्यावसायिक

Web Title: Over 2.5 lakhs tourists visited Kolhapur during long weekend