
सांगली : जिल्ह्यासह राज्यातील साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. गेल्या काही वर्षांपासून मजुरांऐवजी यंत्राद्वारे ऊसतोडणीला प्राधान्य दिले जात आहे. मजूर टंचाईमुळे कारखानदारांनी हा बदल स्वीकारला आहे. जिल्ह्यात मोठ्या कारखान्यांकडे प्रत्येकी २५-३० यंत्रे, तर छोट्या कारखान्यांकडे १० ते १५ यंत्रे ऊसतोडणीचे काम वेगाने करीत आहेत. शेतकरीही मजुरांऐवजी यंत्राच्या तोडणीला प्राधान्य देत आहेत. जिल्ह्यात ३०० हून अधिक यंत्रांद्वारे ऊसतोडणी होत आहे.