बैलगाडा शर्यतीच्या निर्णयामुळे खिलार बाजारात उत्साह 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

पंढरपूर - चैत्री यात्रेनिमित्त वाखरी (ता. पंढरपूर) येथे भरलेल्या खिलार जनावरांच्या बाजारात एक हजाराहून अधिक जनावरे विक्रीसाठी दाखल झाली आहेत. मात्र, सर्वत्र समाधानकारक पावसामुळे चारा व पाणीटंचाई कमी झाली आहे. त्यामुळे चैत्र यात्रेतील बाजारात जनावरांची संख्या काही प्रमाणात घटली आहे. विधिमंडळात कालच (ता. 6) बैलगाडा शर्यतीचे दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह असून, जनावरांच्या बाजारात बैल आणि खोंडांना मागणी वाढण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे. 

खिलार जनावरांसाठी प्रसिद्ध असलेल्या बाजारात या वर्षी कर्नाटकसह राज्याच्या विविध भागांतून खिलार जनावरे दाखल झाली आहेत. त्याचबरोबर पंढरपुरी म्हशीदेखील विक्रीसाठी आल्या आहेत. बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा झाला आहे. या शासन निर्णयाचा चांगला परिणाम या बाजारावर झाल्याचे दिसून आले. अनेक व्यापारी आणि हौशी शेतकऱ्यांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. 

बैलगाडा शर्यतीबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे येथील जनावरांच्या बाजारात खरेदी-विक्री व्यवहारात पुन्हा तेजी आली आहे. हौशी शेतकरीही खिलार खोंड आणि बैल खरेदीसाठी राज्याच्या विविध भागांतून आले आहेत. 
- दिलीप घाडगे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर 
 
Web Title: ox for sale in pandharpur