ध्वनीप्रदुषण प्रकरणी पी.एम.बॉईज' च्या पाच जणांना अटक 

ध्वनीप्रदुषण प्रकरणी पी.एम.बॉईज' च्या पाच जणांना अटक 

कोल्हापूर - विसर्जन मिरवणुकीत ध्वनीप्रदुषणासह पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी लक्षतीर्थ वसाहत येथील "पी. एम. बॉईज'च्या पाच कार्यकर्त्यांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. 

अटक केलेले संशयितांची नावे - सुधाकर रामचंद्र सोनी (वय 35), अवधुत शिवाजी केंगार (वय 19), संतोष उत्तम कांबळे (वय 27), सुरेश रामचंद्र कोळी (वय 45) व फिरोज शौकत बागणीकर (वय 31, सर्व रा. लक्षतीर्थ वसाहत) अशी आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, विसर्जन मिरवणुकीदिवशी रात्री अंबाबाई मंदिर चौक ते गुजरी कॉर्नर या रस्त्यावर "पी. एम. बॉईज' च्या कार्यकर्त्यांनी साऊंड सिस्टीमची तिव्रता वाढवून ध्वनी प्रदुषण केले. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुकी केली. तसेच ट्रॅक्‍टर चालक पळून गेल्याने मिरवणुकीस अडथळा निर्माण झाला. 

या प्रकरणात मंडळाच्या नऊ कार्यकर्त्यांवर जुना राजवाडा पोलिसात गुन्हे दाखल झाले होते. त्यानुसार पोलिसांनी यातील संशयित सुधाकर सोनी, अवधुत केंगार, संतोष कांबळे, सुरेश कोळी, फिरोज बागणीकर या पाच जणांना अटक केली. त्याना न्यायालयात हजर केले असताना त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com