मंगळवेढ्यात 'पानी फाऊंडेशन'च्या महाश्रमदानात नागरिक उत्साहात सहभागी

हुकूम मुलाणी
मंगळवार, 1 मे 2018

मंगळवेढा : पानी फाऊंडेशनच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून चोखोमेळा नगर मध्ये आयोजित केलेल्या महाश्रमदानामध्ये आज 2186 नागरिकांनी सहभाग घेतला.

मंगळवेढा : पानी फाऊंडेशनच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून चोखोमेळा नगर मध्ये आयोजित केलेल्या महाश्रमदानामध्ये आज 2186 नागरिकांनी सहभाग घेतला.

यामध्ये आमदार भारत भालके, रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, जि. प. सदस्या शैला गोडसे, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे, तहसिलदार आप्पासाहेब समींदर, गटविकास अधिकारी राजेन्द्रकुमार जाधव, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सुहास पवार, महेश पाटील, श्रीनिवास गंगणे सह किशोर दत्तु मित्रमंडळ, वारी परिवार,धनश्री परिवार, दामाजी महाविद्यालय कर्मचारी व  माजी विद्यार्थी जवाहरलाल हायस्कूल,आदर्श विचारमंच, पतजंली परिवार,फडके कोचींग रत्नागिरी, हॅन्ड टू समवन पंढरपूर, राष्ट्रवादी काॅग्रेसचे पदाधिकारी,  जेष्ठ नागरिक मंच, मधील सदस्य सहभागी झाले.

तालुक्यात पाणी फौऊडेशन च्या श्रमदानाच्या कामाला वेग आला असून अन्य ठिकाणीच्या कामापेक्षा चोखामेळा नगर मध्ये जोर आला असून यामध्ये श्रमकरी जलमित्र  65, श्रमकरी प्रशासकीय अधिकारी  संघटना  ,84,श्रमकरी गावकरी 543,इतर गावातून/तालुक्यातून आलेले श्रमकरी 829,शाळेचे विद्यार्थी संख्या 637, लोकप्रतिनिधी 28 सहभागी झाले.आज कामात समतळ पातळी चर खोदाईचे काम करण्यात आले. श्रमदानात 179 घन मीटर काम केल्यामुळे 1 लाख 79 हजार लीटर  पाणी साठा होवू शकतो.

Web Title: Paani foundation work in Mangalwedha