यंदाचा पाडवा खरेदी अन्‌ गुंतवणुकीचा...!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

कोल्हापूर - नववर्षाच्या स्वागतासाठी बाजारपेठ सज्ज झाली असून, यंदाही विविध ऑफर्सचा खजिना लुटता येणार आहे. मंगळवारी (ता. २८) हा सण पारंपरिक उत्साहात साजरा होणार आहे. खरेदीचा मुहूर्त या दिवशी साधला जाणार असून, यंदा सर्व प्रकारच्या मोबाइल्सवर इन्शुरन्स फ्री मिळणार आहे. अशा विविध ऑफर्सचे फलक आता सर्वत्र झळकू लागले आहेत.

कोल्हापूर - नववर्षाच्या स्वागतासाठी बाजारपेठ सज्ज झाली असून, यंदाही विविध ऑफर्सचा खजिना लुटता येणार आहे. मंगळवारी (ता. २८) हा सण पारंपरिक उत्साहात साजरा होणार आहे. खरेदीचा मुहूर्त या दिवशी साधला जाणार असून, यंदा सर्व प्रकारच्या मोबाइल्सवर इन्शुरन्स फ्री मिळणार आहे. अशा विविध ऑफर्सचे फलक आता सर्वत्र झळकू लागले आहेत.

त्याशिवाय मुहूर्तावर गुंतवणूकही मोठ्या प्रमाणावर होणार आहे.   
दरम्यान, तयार गुढ्यांनाही यंदा मोठी मागणी राहणार असून, आकारमानानुसार दीडशे रुपयांपासून त्या उपलब्ध आहेत. गुढीच्या काठ्या सत्तर-ऐंशी रुपयांपासून पुढे विक्रीस उपलब्ध होणार आहेत. दरम्यान, गुढीसाठीची काठी अमावस्या लागण्यापूर्वी आणण्याची श्रद्धा असल्याने शनिवार व रविवारी काठ्या खरेदीसाठी गर्दी राहणार आहे. 

तयार गुढ्या
वाढत्या फ्लॅट संस्कृतीमुळे आता तयार गुढ्यांनाही मागणी आहे. दीडशे रुपयांपासून त्या उपलब्ध असून, आकर्षक सजावटींनी तयार केल्या आहेत. या लहान गुढ्यांचे कलश चांदी व विविध धातूंतही तयार केले असून, संपूर्ण चांदीच्या गुढ्याही बाजारपेठेत उपलब्ध आहेत. जागेअभावी या गुढ्या पुजून उत्सव साजरा करण्यावर अनेक ठिकाणी भर दिला जाणार आहे.

साखरेची माळ
साखरेच्या माळाही आता विविध आकारांत उपलब्ध आहेत. पारंपरिक पाच, सात, नऊ गाठींच्या माळांबरोबरच विविध देवदेवतांच्या प्रतिकृतीतही त्या उपलब्ध आहेत. त्यांची किंमत दहा रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत आहे. 

कडुलिंबाची कुंडी
काही निसर्गप्रेमी संस्थांतर्फे गुढी पाडव्याच्या निमित्ताने कडुलिंबाची झाडे लावण्याचे आवाहन केले आहे. काही संस्थांनी गुढीबरोबरच कडुलिबांची एक वर्षाची झाडे असलेल्या कुंड्यांचे पूजन करून ती रोपे दत्तक देण्याचे नियोजन केले आहे.

बाजारपेठही सज्ज
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी करण्याची परंपरा यंदाही जपली जाणार आहे. नुकतीच मार्च एंडिंगची धांदल सुरू असली तरी सरत्या आर्थिक वर्षाला निरोप देताना मोठी उलाढाल होईल, अशी अपेक्षा आहे. या पार्श्‍वभूमीवर ऑटोमोबाइल, रिअल इस्टेटसह इलेक्‍ट्रॉनिक्‍स दुकाने, मोबाइल शॉपीमधील उत्साहाला उधाण आले आहे. 

गुढीची काठी ट्री गार्डसाठी...!
गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील अनेक गावांत ‘गुढीची काठी दान’ हा उपक्रम सुरू आहे. गुढीदानातून संकलित झालेल्या काठ्यांनी ट्री गार्ड बनून परिसरातील झाडांचे जतन व संवर्धन केले. यंदाही अनेक संस्था, मंडळांनी गावागावांत अशी आवाहन पत्रे तयार केली आहेत. ‘कृपया दान करा, गावच्या आरोग्य व सौंदर्यासाठी आपल्या गुढीची एक काठी. गुढीच्या काठीतून तयार होईल एक ट्री गार्ड. तो करेल झाडांचे रक्षण... आपल्या सहभागातून साकारेल एक सुंदर बन, जे देईल पशुपक्ष्यांना आणि माणसांना गारवा...’ अशा स्वरूपाचे हे आवाहन आहे.

Web Title: padava purchasing & investment