पद्श्री डॉ. तात्याराव लहाने डॉ. वसंतराव गरड धन्वंतरी पुरस्काराने सन्मानीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

मोहोळ (जि. सोलापूर) - मोबाईलवरील इंटरनेटच्या अतिवापरामुळे लहान मुलांचे डोळ्याचे बिघडत चालले आहे. घराचे घरपण लोप पावत आहे. इंटरनेटच्या  अतिवापराने मेंदु गुगलकडे गहाण ठेवला जात आहे, हे सांगत असताना वैद्यकिय क्षेत्रात डॉक्टरांनी रूग्णांचे आरोग्य सुधारण्याबरोबरच समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी ही प्रयत्नशील असले पाहीजे असे प्रतिपादन पद्श्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.                                       

मोहोळ (जि. सोलापूर) - मोबाईलवरील इंटरनेटच्या अतिवापरामुळे लहान मुलांचे डोळ्याचे बिघडत चालले आहे. घराचे घरपण लोप पावत आहे. इंटरनेटच्या  अतिवापराने मेंदु गुगलकडे गहाण ठेवला जात आहे, हे सांगत असताना वैद्यकिय क्षेत्रात डॉक्टरांनी रूग्णांचे आरोग्य सुधारण्याबरोबरच समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी ही प्रयत्नशील असले पाहीजे असे प्रतिपादन पद्श्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.                                       
वैद्यकिय क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या  मान्यवरांना कै. संभाजीराव गरड बहुउद्देशीय व संशोधन संस्थेच्या वतीने देण्यात येणारा कै. डॉ. वसंतराव गरड धन्वंतरी पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. प्रसिध्द नेत्ररोग व नेत्रशल्य विशारद पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना कै. वसंतराव गरड धन्वंतरी पुरस्कार स्वामी रामानंद विद्यापिठ नांदेडचे माजी कुलगुरू व माजी खासदार डॉ जनार्दन वाघमारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यीक डॉ राजेंद्र दास होते. कै. संभाजीराव गरड बहुउद्देशीय व संशोधन संस्था व कै .डॉ वसंतराव गरड धन्वंतरी पुरस्कार समितीतर्फे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी माजी कुलगुरू डॉ जनार्दन वाघमारे म्हणाले की दृष्टीहिनांच्या अंधकारमय जिवणात  खऱ्या अर्थाने प्रकाश निर्माण करण्याचे काम डॉ लहाने करीत असुन खऱ्या अर्थाने ते देवदुतच आहेत. 

यावेळी व्यासपिठावर जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष व माजी आमदार राजन पाटील, संस्थेचे सचिव प्रतापसिंह गरड, अध्यक्ष बाबासाहेब क्षिरसागर, खजिनदार प्रविणसिंह गरड, नगराध्यक्ष रमेश बारसकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिपक गायकवाड, भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीश काळे, शिवसेना तालुकाध्यक्ष काका देशमुख, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक देशमुख, भाजपाच्या अनुसुचीत मोर्चाचे प्रदेश चिटणीस संजय क्षिरसागर, डॉ कौशीक गायकवाड, डॉ. सत्यजीत मस्के आदी उपस्थित होते. सत्कार मुर्तीच्या सन्मानपत्राचे वाचन बाजीराव जोशी यांनी केले . मान्यवरांचा परिचय प्रा. नंदकुमार देंशपांडे यांनी केली. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब क्षिरसागर यांनी केले. आभार प्राचार्य डॉ तिकटे डी. एस. यांनी मानले. या कार्यक्रमास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी, क्षेत्रातील बहुसंख्यासह  महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थीत होते.

परमेश्र्वराने दिलेल्या नाशवंत शरीराचा मृत्युनंतर गरजुसाठी उपयोग झाला पाहीजे हे सांगत असताना अवयव दान करा हे भावनिक आवाहन डॉ लहाने यांनी उपस्थितांना केले. 

या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने पुरस्कार समितीचे अध्यक्ष बाजीराव जोशी सर, सदस्य आर. व्ही. माने, अधीक्षक आदिनाथ काळे, प्रा. नंदकुमार देशपांडे, मुख्याध्यापिका दिपमाला देशमुख, प्रा. बनाटे, प्रा. गवळी, गणेश घोगरे, राजू मुळे, आण्णा गवळी, बंडु हंपे, रवि गरड, उत्तरेश्र्वर मांडवे आदीनी परिश्रम घेतले.

Web Title: Padmashree Dr Tatyarao Lahane honored By Dr Vasantrao Garad Dhanvantari Award