पाडळीतील सासनकाठीचे मंगळवारी प्रस्थान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

नागठाणे - राज्यातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाडळी (निनाम, ता. सातारा) येथील मानाच्या सासनकाठीचे मंगळवारी (ता. 16) वाडी रत्नागिरीकडे 
प्रस्थान होणार आहे.

पाडळी येथील सासनकाठीला वाडी रत्नागिरी (जि. कोल्हापूर) येथील छबिना सोहळ्यात मानाचे अग्रस्थान आहे. चारशेहून अधिक वर्षाची परंपरा या सोहळ्याला लाभली आहे. त्या दृष्टीने दर वर्षी ही सासनकाठी भाविकांसमवेत वाडी रत्नागिरीला पोहचते. हा संपूर्ण प्रवास पायी होतो.

त्यात भाविक मोठ्या श्रद्धेने, उत्साहाने सहभागी होतात. या वेळी मंगळवारी प्रस्थानाचा दिवस आहे. पहाटे सहा ते सकाळी साडे दहा या वेळेत प्रस्थानाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर हरपळवाडी, पाली, शिवडे, उंब्रज, इंदोली, क-हाड, कासेगाव, ऐतवडे, केखले, जाखले असे काठीचे मार्गक्रमण होणार आहे.

दरम्यान, ही काठी गुरुवारी (ता. 18) जोतिबा डोंगरावरील सोहळ्यात सहभागी होणार आहे. शुक्रवारी दुपारी मुख्य छबीना सोहळा होणार आहे.

त्यानंतर रविवारी परतीचा प्रवास सुरु होणार आहे. पुढील बुधवारी  (ता. 24) ही काठी पुन्हा पाडळी गावात दाखल होणार आहे. यावेळी सायंकाळी पाच वाजता पावक्ता मंदिरापासून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर चव्हाटा येथे मुख्य छबीना सोहळा होणार आहे.

दरम्यान, या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री जोतिर्लिंग देवस्थान समिती व ग्रामस्थांतर्फे देण्यात आली आहे.

Web Title: Paduli Sasan Kathi tradition