धक्‍कादायक : चिमुरडीचा विजेचा शॉक बसून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

पंढरपूर (सोलापूर) : जत्रेच्या निमित्ताने मामाच्या गावाला आलेल्या एका चिमुरडीचा विजेचा शॉक बसून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तालुक्‍यातील खेडभाळवणी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांकडे कोणतीही नोंद झालेली नाही.

पंढरपूर (सोलापूर) : जत्रेच्या निमित्ताने मामाच्या गावाला आलेल्या एका चिमुरडीचा विजेचा शॉक बसून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तालुक्‍यातील खेडभाळवणी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांकडे कोणतीही नोंद झालेली नाही.

तालुक्‍यातील खेडभाळवणी येथे श्री यल्लम्मा देवीची जत्रा सुरू आहे. या जत्रेच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी आजूबाजूच्या परिसरातील लोकांची मोठी गर्दी होत असते. तालुक्‍यातील कौठाळी येथील सानिका संतोष जाधव (वय 11) ही देखील जत्रेच्या निमित्ताने तिचे मामा सुनील साळुंखे यांच्याकडे खेड भाळवणी येथे आली होती. 

हेही वाचा- पंढरपूर : रेल्वेच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू 

विजेच्या खांबाजवळ उभी होती 
गावातील विजेच्या खांबाजवळ ती उभी असताना तिला शॉक बसून तिचा जागीच मृत्यू झाला. ऐन जत्रेत घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे गावावर शोककळा पसरली. ग्रामपंचायत आणि महावितरणने जत्रेच्या निमित्ताने हजारो भाविक गावात येत असताना देखील विजेच्या संदर्भातील देखभाल व दुरुस्ती गांभीर्याने न केल्यामुळे चिमुरड्या सानिका जाधव चा मृत्यू झाला अशी चर्चा होत आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur : Chimurdi's death in electric shock