पंढरपूर : मंदिर समितीच्या सदस्यांच्या सांगण्यावरुन भाविकांकडून पैसे

In Pandharpur From the request of members of the temple committee money from the devotees
In Pandharpur From the request of members of the temple committee money from the devotees

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हजारो वारकरी रांगेत थांबलेले असताना पैसे घेऊन भाविकांना झटपट दर्शन घडवण्याचा काळाबाजार गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होता. नुकत्याच उघड झालेल्या अशा प्रकारात अटक केलेल्या तरुणांनी मंदिर समितीचा सदस्य सचिन अधटराव याच्या सांगण्यावरुन भाविकांकडून पैसे घेतल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. देवाच्या दारात होणारा दर्शनाचा काळाबाजार कायमस्वरुपी थांबवण्यासाठी तुळजापूरच्या धर्तीवर तातडीच्या दर्शनासाठी सशुल्क दर्शन व्यवस्था सुरु करण्यासह काही ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.

गेल्या काही वर्षांपासून राज्यातील महामंडळांच्या प्रङ्काणेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर राजकीय व्यक्तींची सोय लावली जाते. सध्याच्या शासनाने देखील मंदिर समितीवर भारतीय जनता पक्षाचे कराड येथील नेते डॉ.अतुल भोसले यांची अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. वारकरी प्रतिनिधींना समितीवर अधिक स्थान मिळावे यासाठी नंतर पंढरपूर मंदिरे कायद्यात बदल करुन शासनाने सहअध्यक्षपदाची निर्मिती करुन गहिनीनाथ ङ्कहाराज औसेकर यांची त्यापदावर नियुक्ती केली. पंधरा जणांची जी स्थायी स्वरुपाची समिती नेमली आहे त्यामध्ये भाजपा शिवसेनेशी संबंधितांना स्थान देण्यात आले आहे. या सदस्यांनी भाविकांना सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी काही मंडळी भाविकांना दर्शनाला सोडून पैसे मिळवण्याचा धंदा करत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत होत्या.

भाविकाला गाठून त्याच्याशी झटपट दर्शनासाठीचा सौदा ठरवला जातो. यात्रा काळ तसेच अन्य काळात गर्दी आणि महत्वाच्या दिवशी प्रत्येकी पाचशे रुपयांपासून ते तीन-चार हजारा पर्यंत पैसे घेऊन भाविकांना झटपट दर्शन घडवले जाते. हा गोरख धंदा करण्यासाठी मंदिर परिसरातील काही खुले विक्रेते, रिक्षेवाले, टांगेवाले यासह अनेक बेरोजगार तरुणांची साखळी निर्माण करण्यात आली असून प्रत्येकाला काही टक्के रक्कम देऊन बिनबोभाट दररोज हजारो रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा होत होती.

या संदर्भात ‘सकाळ‘ ने आवाज उठवल्यावर मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. भोसले यांनी समितीच्या बैठकीत दर्शनाचा काळाबाजार करणाऱ्या मंडळींना खडसावले होते. तसेच सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची चौकशी समिती नेमली होती परंतु कोणावरही ठोस कारवाई झाली नव्हती. 

नुकताच उघड झालेला दर्शनाचा काळाबाजार सङ्कितीचे शिवसेना नियुक्त सदस्य सचिन अधटराव यांच्या सांगण्यावरुन केला जात होता असे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्याला आज न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मंदिर समिती सदस्यच अशा प्रकारात गुंतलेले असल्यास निष्पन्न झाल्यास ते अधिक गंभीर ठरणार आहे. त्यामुुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन या पुढच्या काळात असे गैरप्रकार होऊ नयेत यासाठी दक्षता घेतली पाहिजे.

तुळजापूरला शंभर रुपये शुल्क देणाऱ्यांसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. पंढरपूर येथे होणारा दर्शनाचा काळाबाजार बंद करण्यासाठी तुळजापूरच्या धर्तीवर दर्शन व्यवस्था करण्याची गरज आहे. परंतु काही वारकरी व महाराज मंडळींचा विरोध असल्याने मंदिर समितीकडून असा निर्णय घेण्याचे टाळले जात आहे. विरोध करणाऱ्या संबंधितांशी चर्चा करुन तातडीने या संदर्भातील कार्यवाही करावी अशी मागणी भाविकांमधून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com