पंढरपूर : श्री विठ्ठल मंदिराचा जीर्णोध्दार करणार

पंढरपूर : श्री विठ्ठल मंदिराचा जीर्णोध्दार करणार

पंढरपूर : केंद्रीय पुरातत्व विभागाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर त्यांच्या अधिपत्याखाली येत नसल्याचे कळवले असले तरी त्यांच्या आणि राज्य पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शकतत्वानुसार मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम सुरु करण्यात येणार आहे. ते काम करताना दहाव्या शतकातील मंदिराचा भास होईल असे स्वरुप मंदिराला देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहितीश्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांनी दिली.

डॉ. भोसले म्हणाले, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे जगातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे.  अनेक दिवसांपासून या मंदिराच्या जीर्णोध्दाराचे कामप्रलंबित होते. परंतु पुरातत्व विभागाच्या परवानगी शिवाय मंदिरात सुधारणा करता येत नव्हत्या. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने गेल्या वर्षभरात केंद्रीय पुरातत्व विभागाकडे सातत्याने पाठपुरावाकेला. या विभागाने पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर त्यांच्या अधिपत्याखाली येत नसल्याचे मंदिर समितीला लेखी कळवले आहे. त्यामुळे मंदिरातील आवश्यक सुधारणा करण्याचा निर्णय आता मंदिर समितीला घेता येणार आहेतथापी केंद्रीय आणि राज्य पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम केले जाणार आहे. ते काम करताना सध्याया मंदिराला दहाव्या शतकातील मंदिराचे रुप यावे यादृष्टीने आराखडा तयार केला जाणार आहे असे डॉ.भोसले यांनी स्पष्ट केले. 

मागील वर्षभरात मंदिर समितीचे काम पाहून लोकांचा विश्वास वाढला आहे. तंयामुळे जीर्णोध्दारासाठी लागणारा निधी देण्यास अनेक भक्तांकडून प्रतिसाद मिळेल असा विश्वास डॉ.भोसले यांनी व्यक्त केला.

पार्श्वभूमी
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात काही वर्षापूर्वी मंदिर समितीने अनेक सुधारणा परस्पर केल्या होत्या. त्यामुुळे मंदिरातील अंतर्गत लूक बदलला होता. श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यातील काळपट दगडावर ग्रेनाईट बसवण्यात आले तसेच वेगवेगळया प्रकारची रंगरंगोटी करण्यात आली. मंदिराच्या पश्चिम दरवाज्यावर गोपूर बांधण्यातआले. हे बदल काही भाविकांना आवडले तर काही भाविकांनी नापसंती व्यक्त केली होती. त्यामुळे गेल्या पंधरा, वीस वर्षांपासून समितीने पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुनआवश्यक सुधारणा करण्याची पध्दत अवलंबली होती. श्री विठ्ठल मूर्तीला इपॉक्सी कोटींग करण्याचे काम औरंगाबादच्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनच करुन घेण्यात आले होते.

अभ्यासकांची अपेक्षा
येथील पुरातन वास्तू शैलीचे अभ्यासक अॅड.धनंजय रानडे यांना विचारले असता ते म्हणाले, श्री विठ्ठल मंदिरातील केवळ पाच ते दहा टक्के भाग हा अकराव्या आणि बाराव्या शतकातील आहे. बाकीचे बांधकाम अठराव्या शतकातील आहे. त्यामुळे ढोबळ मानाने मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी असले तरी काही बांधकाम उत्तर मराठा काळातील वास्तूशैली नुसार बांधण्यात आले आहे. मंदिरातील गाभारा, सोळखांबी, महाव्दाराच्या बाजूचे दोन कट्टे, ओवऱ्या ही या मंदिराची वैशिष्ठ्ये आहेत. मंदिर समितीने मंदिराच्या सुशोभीकरणासाठीआवश्यक सुधारणा जरुर कराव्यात परंतु या सुधारणा करत असताना मंदिराचे प्राचीन स्वरुप बदलणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com