'सैराट'मधील त्या विहिरीत पडून वारकऱ्याचा मृत्यू

अण्णा काळे
गुरुवार, 29 जून 2017

दिंडीतील वारकरी मोहन नामदेव बोगळ हे पहाटे शौचालयाला जाताना 96 पायऱ्याची विहीर न दिसल्याने ते विहीरीत पडले.

करमाळा : श्रीदेवीचामाळ (ता. करमाळा) येथे 96 पायऱ्याच्या विहीरीत पडून वारकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली. या 96 पायऱ्याच्या विहीरीत सैराट चित्रपटाचे चित्रिकरण झाल्याने सर्व महाराष्ट्राला परिचित आहे.

मोहन नामदेव बोगळ (वय 75, रा. वाकळी खंडोबाचे, ता. रहाता, जि.अहदनगर) असे मृत्यू झालेल्या वारकर्याचे नाव आहे. श्री खंडोबा दिंडी सोहळा बुधवारी श्री देवीचामाळ येथे मुक्कामाला आला होता. दिंडीतील वारकरी मोहन नामदेव बोगळ हे पहाटे शौचालयाला जाताना 96 पायऱ्याची विहीर न दिसल्याने ते विहीरीत पडले.

साधारणपणे 50 फुट उंचीवरून ते विहीरीत पडले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाला होता. करमाळा उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी त्यांचा मृतदेह मृतदेह त्यांच्या मूळ गावी रा. वाकळी खंडोबाचे, ता. राहता, जि. अहदनगर येथे पाठवण्यात आले आहे.

Web Title: pandharpur wari 2017 solapur news karmala sairat well warkari dies