पन्हाळा पंचायत समिती सभापतीपदी अनिल कंदुरकर बिनविरोध

पन्हाळा पंचायत समिती सभापतीपदी अनिल कंदुरकर बिनविरोध

आपटी -  पन्हाळा पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या विशेष सभेत सभापतीपदी अनिल कंदुरकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रभारी तहसिलदार अनंत गुरव यांनी जाहीर केले. पृथ्वीराज सरनोबत यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.

वेखंडवाडीचे माजी सरपंच राहिलेले अनिल कंदूरकर हे वाडी रत्नागिरी मतदार संघाततून १२०० मतांनी निवडून आले आहेत. पन्हाळा पंचायत समितीच्या सभापती निवड ३० जुलै रोजी होणार होती. पण लोकभावनेचा आदर करून मराठा आंदोलनाला जाहीर पाठींबा देण्याचा निर्णय जनसुराज्य शक्ती पक्षाने घेतल्याने, पक्षादेश मानत अनिल कंदुरकर यांनी सभापती पदासाठी भरलेला उमेदवारी अर्ज माघारी घेतला होता. त्यामुळे निवडणुक विभागाने निवड प्रक्रिया रद्द केली होती. त्यावेळी रद्द झालेली निवड प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज पुन्हा राबविण्यात आली.       

जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी
सभापतीपदासाठी वाडीरत्नागिरी गणातून निवडून आलेले कंदूरकर यांचे नाव सर्वानुमते पूर्वीच निश्चित केले होते. त्यामुळे पन्हाळा बांदारी परिसराला प्रथमच सभापतीपद मिळाला आहे. कंदुरकर  यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटक्याची आतिषबाजी करत अनिल कंदुरकर यांची जल्लोषी
मिरवणुक काढली. यावेळी माजी सभापती पृथ्वीराज सरनोबत, उपसभापती उज्वला पाटील, सदस्य संजय माने, वैशाली पाटील, तेजस्विनी शिंदे, गीता पाटील, रेखाताई बोगरे, रेश्मी कांबळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com