करुन दाखवलच! पपईची यशस्वी लागवड; एकरी घेतोय लाखोंच पीक

करुन दाखवलच! पपईची यशस्वी लागवड; एकरी घेतोय लाखोंच पीक
Summary

कृष्णा नदी व सिंचन योजना, ताकारी, टेंभू, आरफळ योजनेमुळे परिसरास पाण्याची कमतरता भासत नाही.

कुंडल : कुंडल परिसर ऊस, द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे. परिसरातील सहकारी साखर कारखान्यांमुळे बहुसंख्य शेतकरी ऊसाचे पीक घेण्यावरच भर देतात. कृष्णा नदी व सिंचन योजना, ताकारी, टेंभू, आरफळ योजनेमुळे परिसरास पाण्याची कमतरता भासत नाही. द्राक्षे, भाजीपाल्याबरोबर तरुण शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहे. असाच प्रयत्न राहुल पवार व सचिन पवार यांनी वडील राजाराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केला आहे. त्यांनी पपईची शेती यशस्वी करून दाखवली आहे.

एक एकर क्षेत्रांतून त्यांनी आत्तापर्यंत सोळा लाखहून अधिक रूपयांचे उत्पन्न घेतले आहे. परिसरात कौतुक होत आहे. आंधळी रस्ता भागीरथी ओढ्याजवळ पवार यांचे एक एकर क्षेत्र आहे. राहूल व सचिन यांनी ग्रीन बेरी जातीच्या पपईची लागण केली होती. जून २०१९ मध्ये त्यांनी येथे ९०० रोपांची लागण केली. आठ बाय सहा अंतरावर रोपे लावली. रोपे इंदोर (मध्यप्रदेश) येथून आणली. शेण खत, रासायनिक खते, औषधे, फवारणी, आळवणी लक्षपूर्वक करण्यात आली. ठिबकने पाणी देण्यात आले. रोपांची लागण केल्यानंतर आठव्या महिन्यात उत्पादन व प्रत्यक्ष विक्री सुरू झाली. ती अद्याप सुरूच आहे.

करुन दाखवलच! पपईची यशस्वी लागवड; एकरी घेतोय लाखोंच पीक
किरीट सोमय्या कोल्हापुरात दाखल; थोड्याच वेळात घेणार अंबाबाईच दर्शन

मार्च दोन हजार वीसपासून विक्रीस प्रारंभ झाला. वैशिष्ट्य म्हणजे झाडाची उंची वीस-पंचवीस फुटापर्यंत झाली आहे. फळे काढण्यासाठी उंच लाकडी शिडीचा वापर करावा लागत आहे. शिडी लावूनच फळे काढावी लागत आहे. आत्तापर्यंत सुमारे १८० टन उत्पन्न निघाले आहे. बाजारपेठेत ती विक्रीस पाठवली आहेत. अजूनही क्षेत्रात २५ ते तीस टन पपई तयार आहे. तीही विक्रीस जाणार आहे. सरासरी प्रति किलो नऊ रुपये दर मिळाला. आत्तापर्यंत सुमारे १६ लाख रुपयांहून अधिक उत्पन्न निघाले आहे. त्यांना साडे चार लाख रुपये खर्च आला आहे. उत्पादन खर्च वजा करता निव्वळ फायदा आत्तापर्यंत ११ लाख ७० हजार रुपये मिळाला आहे.

पपईचा प्लॉट पाहण्यास अनेकजण परिसरातून भेटी देत आहे. जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, विश्वास जाधव, नंदकुमार लाड, अरुण पवार, अमर लाड, विलास पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. पपई फळे वाशी मार्केट, मुंबई, गोवा, हैदराबाद येथे विक्रीस गेला आहे. दत्तात्रय देशमुख, सचिन पाटील, संजय हरवले यांचे सहकार्य लाभल्याचे कुटुंबियांनी सांगितले. पपईचा माल ट्रॅक्‍टरच्या साह्याने शेतातून बाहेर काढण्यात येत आहे. प्रत्येक फळ कागदात पॅक करून पाठविण्यात येते. काही वेळा मजूरांचीही मदत घेतली जाते.

करुन दाखवलच! पपईची यशस्वी लागवड; एकरी घेतोय लाखोंच पीक
चार वाजता काढणार घोटाळा बाहेर; सोमय्यांच्या रडारवर आणखी किती नेते?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com