मधुरांगण परिवारातर्फे उद्या पेपर क्विलिंग कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

कोल्हापूर - सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना यंदा मधुरांगण परिवारातर्फे विविध कार्यक्रमांची पर्वणी महिलांना मिळणार आहे. सर्जनशीलतेतून विविध कलाकृती साकारताना निखळ मनोरंजनातून आरोग्यदायी संकल्पही या निमित्ताने करता येणार आहे. शनिवारी (ता. 31) पेपर क्विलिंग कार्यशाळा आणि रविवारी (ता. 1) "जोडी तुझी माझी' स्पर्धा रंगणार आहे.

कोल्हापूर - सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना यंदा मधुरांगण परिवारातर्फे विविध कार्यक्रमांची पर्वणी महिलांना मिळणार आहे. सर्जनशीलतेतून विविध कलाकृती साकारताना निखळ मनोरंजनातून आरोग्यदायी संकल्पही या निमित्ताने करता येणार आहे. शनिवारी (ता. 31) पेपर क्विलिंग कार्यशाळा आणि रविवारी (ता. 1) "जोडी तुझी माझी' स्पर्धा रंगणार आहे.

पेपर क्विलिंग कार्यशाळेत ग्रीटिंग्ज, हेअर रिंग्ज, पिन्स अशा बेसिक कलाकृती शिकवल्या जाणार आहेत. दीप्ती कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा होईल. शनिवारी (ता. 31) सकाळी अकरा वाजता शिवाजी उद्यमनगर येथील "सकाळ' कार्यालयात कार्यशाळा होणार आहे. मधुरांगण सभासदांना पन्नास रुपये, तर बिगर सभासदांना दीडशे रुपये प्रवेश शुल्क असेल. या कार्यशाळेसाठी नोंदणी आवश्‍यक असून शुक्रवार (ता. 30) पर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत "सकाळ' कार्यालयात नोंदणी करावी.

रविवारी (ता. 1) सकाळी दहा वाजता शाहूपुरी गवत मंडई येथील "हॉटेल झोरबा'च्या आनंद सभागृहात "जोडी तुझी माझी' स्पर्धा रंगणार आहे. विजेत्या जोडीला तीन हजार रुपये आणि इतर दोन जोड्यांना आकर्षक बक्षीस दिले जाईल. पहिल्या फेरीत कोणताही एक कलाप्रकार स्पर्धक जोडीला सादर करावयाचा असून दुसरी फेरी प्रश्‍नोत्तराची असेल. स्पर्धेसाठी न्यू गुजरीतील दत्ताजीराव परशराम माने सराफ पेढी आणि हॉटेल झोरबाचे विशेष सहकार्य मिळाले आहे. स्पर्धेसाठी मधुरांगण सभासदांना शंभर तर बिगर सभासदांना दीडशे रुपये प्रवेश शुल्क असेल. इच्छुकांनी "सकाळ' कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत नोंदणी करणे आवश्‍यक आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- 9146041816.

सुवर्ण ठेव भिशी योजनेवर चांदीचे नाणे...!
गुजरी म्हटले, की दत्ताजीराव परशराम माने सराफ हे नाव साऱ्यांच्याच नजरेसमोर हमखास येते. गेल्या सात दशकांहून अधिक वर्षे येथील ग्राहकांना विश्‍वासार्ह सेवा देणारी ही पेढी. अमृत महोत्सवाकडे वाटचाल करणारी ही पेढी पारंपरिक दागिन्यांसह सध्याच्या तरुणाईच्या अपेक्षांची पूर्तता करणाऱ्या सर्व व्हरायटींनी सजली आहे. सोन्याची शुद्धता, हॉलमार्क दागिने, वाजवी दर ही पेढीची वैशिष्ट्ये आहेत. सुवर्ण ठेव योजना ही संकल्पना पहिल्यांदा या पेढीने सुरू केली आणि आजही ती येथे उपलब्ध आहे. महिन्याला विशिष्ट रक्कम या योजनेतून ग्राहक पेढीकडे जमा करतात. वर्षानंतर पेढी स्वतःचा एक हप्ता एकूण रकमेत जमा करते आणि एकूण रकमेचे दागिने ग्राहकांना करून घेता येतात. 2017 साठी सुवर्ण ठेव भिशी योजना पेढीने जाहीर केली असून एक जानेवारी ते दहा जानेवारीदरम्यान प्रतिमहिना एक हजारांवर भिशी सुरू करणाऱ्या ग्राहकांसाठी पेढीतर्फे पाच ग्रॅम चांदीचे नाणे भेट दिले जाणार आहे. नववर्षाची ही आकर्षक भेट एक जानेवारीपासून न्यू गुजरी जैन मंदिरासमोरील दत्ताजीराव परशराम माने सराफ पेढीमध्ये मिळवता येणार आहे. चला, तर मग या अनोख्या भेटीचा लाभ घेऊ या...!

Web Title: Paper Quilling Workshop by tomorrow madhurangan family