पार्ले ग्रामपंचायत चालवते पिठाची चक्की! 

हेमंत पवार
शनिवार, 2 जून 2018

कऱ्हाड - ग्रामपंचायतीला गावातूनच उत्पन्नाचे साधन सुरू व्हावे, या उदात्त हेतूने सातारा जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष, माजी आमदार (कै.) आबासाहेब पाटील-पार्लेकर यांनी तब्बल ५५ वर्षांपूर्वी त्यांच्या पार्ले गावामध्ये पिठाची चक्की सुरू केली. ग्रापंचायतीच्या मालकीची चक्की असल्याने ती लवकर बंद पडेल, असे अनेकांना वाटत होते. मात्र, गेली ५५ वर्षे ही चक्की गावकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने चालवून कमी दरात दळण देऊन लोकांचीही चांगली सोय केली आहे.  

२६ मार्च १९६४ रोजी ही पिठाची चक्की सुरू केली. त्याव्दारे गावातील लोकांना बाहेरच्यापेक्षा कमी दरात गावातच दळण दळून मिळण्याची सोय झाली. संबंधित चक्की ग्रामपंचायतीव्दारे सुरू असल्यामुळे आणि इतर ठिकाणांपेक्षा दरही कमी असल्याने पार्लेसह अन्य जवळच्या गावातील लोकही तेथून दळण दळून नेत असल्याचे तेथील ग्रामस्थ सांगतात. संबंधित चक्कीसंदर्भातील जमा-खर्च दरवर्षी १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत मांडला जातो. तेथेच चक्की कोणाला चालवायला द्यायची, याचाही निर्णय ग्रामपंचायत करते. ज्याला चक्की खर्च जावून कमी दरात चालवायची आहे, तो संबंधित ग्रामसभेत चक्की चालवण्यासाठी ठराविक रकमेमध्ये घेणार असल्याचे जाहीर करतो. त्यामध्ये सर्वानुमते चक्की कोणाला चालवायला द्यायची, याचा निर्णय घेतला जातो. त्यानंतर संबंधितामार्फत ती चक्की वर्षभरासाठी चालवायली जाते, त्यातून लोकांची गावातच सोय होऊन ग्रामपंचायतीलाही उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे.

ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे साधन असावे या हेतूने (कै.) आबासाहेब पार्लेकर यांनी सुरू केलेली पिठाची चक्की आजही आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालवत आहोत. त्याद्वारे ग्रामस्थांनाही कमी दरात दळण दळून दिले जाते आणि त्यांची चांगली सोयही होत आहे.
- प्रकाशराव नलवडे-पाटील  सरपंच, पार्ले 

Web Title: Parle Gram grampanchayat runs Flour mill