पारनेर - गणपती फाट्यानजीक बिबट्या अत्यवस्थ स्थितीत आढळला

मार्तंड बुचुडे
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

पारनेर - विरोली येथील गणपती फाट्यानजीक फुलदरा  वस्तीजवळ बिबट्या अत्यवस्थ स्थितीत आढळून आला. परिसरातील नागरिकांनी वन विभागास कळल्यानंतर तेथे तात्काळ वनविभागाचे अधिकारी दाखल झाले. बिबट्याला पारनेर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी नेले.

तालुक्यातील या आठवड्यातील बिबट्या मृत होण्याची ही दुसरी घटना आहे. चारच दिवसापूर्वी वाडेगव्हान परिसरात नगर पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक बिबट्या ठार झाला होता.

पारनेर तालुका दुष्काळी असला तरी दऱ्या व वनविभागाच्या वणीकरनात झाडाची संख्या वाढल्याने जंगलात बिबट्याने खाद्य मिळत नसल्याने बिबटे मानवी वस्ती जवळ येत आहेत. दोन दिवसापूर्वी बबन बुचूडे यांचे गाईचे लहान वासरू तर धोंडिभाऊ भागवत यांच्या दोन शेल्याचा फडशा पडला होता.

या पूर्वीही शेतकऱ्यांना रात्री शेतात पाणी देताना  बीबट्याचे दर्शन झाले आहे. विरोली ग्रामस्थानी पिंजरा लावण्याची मागणी केलली मात्र वन विभागाने दखल घेतली नाही. या बिबट्यास वनविभागाने पकडले असते तर कदाचित तो वाचला असता.

आज आढळलेला बिबट्या साधान चार वर्ष वयाचा असावा.व महामार्गावर अपघातात मृत झालेला बिबट्या अवघा दीड ते दोन वर्ष वयाचा होता तालुक्यातील बिबट्यांची संख्या वाढली आहे.

या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा भिंगे, वनपाल पल्लवी उंडे, के.एस रोकडे, वनरक्षक निर्मला शिंदे, एस.एस.चव्हाण, गजानन वाघमारे, निशा आगलावे, सरपंच प्रभावती मोरे आदिंनी तातडीने पिंजरा आणून त्यास पशुवैद्यकीय दवाखान्यात पारनेर येथे नेले तेथे पशुवैद्यकीय अधिकारी हर्षदा ठुबे यांनी उपचार केले.

बिबट्यास एक तर सर्प दंश किंवा विषबाध झाली असावी बिबट्याची अवस्था वाईट आहे जगण्याची शक्यता कमी आहे.शवविच्छेदना नंतरच कारण समजणार आहे. - हर्षदा ठुबे पशुवैद्यकीय अधिकारी पारनेर.

Web Title: Parner - leopard found very lasting position