हजारेंच्या समर्थनार्थ पारनेरमध्ये मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

पारनेर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी, तसेच या आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी राळेगणसिद्धी परिवार व पारनेर तालुक्‍यातील सर्वपक्षीयांच्या वतीने आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पारनेर पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री औटी, सभापती राहुल झावरे, उपसभापती दीपक पवार आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हजारे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या (ता. 27) सकाळी 11 वाजता नगर-पुणे महामार्गावर राळेगणसिद्धी फाटा व नगर-कल्याण मार्गावर भाळवणी या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
Web Title: parner news anna hazare rally