पारनेरला शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

पारनेर - कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सुमारे 40 हजारांवर कांदा गोण्यांची विक्रमी आवक झाली. निर्यातही बंद असल्याने बाजार समिती आवारात आज 12 ते 16 रुपये किलो दर निघाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव तीन तास बंद पाडले. सभापती व व्यापाऱ्यांनी तोडगा काढत दुपारी अडीच वाजता पुन्हा कांद्याचे लिलाव सुरू केले.

काही दिवसांपासून कांद्याचे दर कमी होत आहेत. आज मात्र अचानक कोसळले व थेट 12 ते 16 रुपयांवर येऊन ठेपले. यापूर्वी 50 रुपये किलोचा बाजार मिळालेले शेतकरी आज अचानक एवढ्या मोठ्या घसरणीमुळे संतप्त झाले. त्यांनी लिलावच बंद पाडले. दरम्यान, सभापती प्रशांत गायकवाड यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा केली. राज्यात सगळीकडे बाजारभाव कमी झाले आहेत, आम्ही काय करणार, असे म्हणून त्यांनीही आज लिलाव बंद ठेवा, अशी आग्रही मागणी केली.

Web Title: parner news nagar news farmer onion auction close