पक्षाला ७ राज्यात मिळेल सत्ता

माजी सीएम विरप्पा मोईली; युतीचा पर्यायही खुला
 Former CM Virappa Moily
Former CM Virappa Moily sakal

बेळगाव : कर्नाटकासह विविध ७ राज्यात २०२३-२४ मध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर होणार आहे. निवडणुकीची तयारी आतापासून सुरु केली आहे. पक्ष बांधणी व संघटनेच्या जोरावर एकहाती सत्ता मिळवू. अनिवार्य संदर्भात युतीचा पर्याय खुला ठेवला जाईल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री विरप्पा मोईली यांनी आज (ता.२०) कॉंग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

श्री मोईली म्हणाले,‘‘कॉंग्रेस पक्षात मतभेद नाहीत. यामुळे एकसंघ पक्ष आहे. सर्वंजन मिळून काम करत आहेत. २०२४ मध्ये देशातील ७ राज्यात विधानसभेची निवडणूक आहे. यात पक्षाला नक्की यश मिळाले. एकहाती सत्ता मिळेल. मात्र, अनिवार्य संदर्भात युतीचा पर्याय निवडला जाईल. देशात शांतता व समृध्दीमध्ये घट झाली आहे. जागतिक पातळीच्या विश्‍लेषणामध्ये भारत क्रमवारीत १३८ व्या स्थानी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार कोरोनास्थिती व्यवस्थित हाताळण्यात अपयशी ठरले आहे.

परिणामी शैक्षणिक व आर्थिक पातळीवर आरिष्ठ ओढविले आहे. पंतप्रधान मोदी त्यावर चकार शब्द उच्चारण्यास तयार नाही. यास्वरुपाच्या धोरणांमुळे आर्थिकस्थिती चिंताजनक झाली आहे. जनतेचा आत्मविश्‍वास ढासळत आहे. देशापुढे अस्तीत्वाचा प्रश्‍ उपस्थित होतो का? अशी चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनात मृत पावलेल्यांची निश्‍चित माहिती देण्यात आली नाही. राज्य, केंद्र सरकार उत्तम सरकार देण्यात अपयशी ठरले आहे. स्थिती अशीच कायम राहिल्यास भारताची स्थिती श्रीलंकाप्रमाणे होईल, असा आरोप केला.

अलिकडे पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यापूर्वी डिझेल आणि पेट्रोल दर स्थिर होते. गॅसचे दर वाढविले नव्हते. निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर दरवाढ घोषित केली आहे. आम जनतेच्या खिशाला झळ पोचविली आहे, अशी टीका मोईली यांनी केली.

यावेळी जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, सचिव सुनील हणमन्नावर, नगर विभागाचे अध्यक्ष राजू शेठ, प्रदीप एम. जी., बसवराज शेग्गावी, मल्लप्पा मुरगोड, अरविंद दळवाई, परशूराम वग्गण्णावर, विजय गेज्जी, बाबासाहेब पाटील, मलगौडा पाटील, आयेशा सनदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com