नगरमध्ये दारूच्या पार्टीने घेतला चौघांचा बळी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली. दिवसभर प्रचार करून थकलेल्या कार्यकर्त्यांसाठी ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे यांच्यासह पोलीस पथक नगरच्या शासकीय रुग्णालयात पोचले.

नगर - पांगरमल (ता. नगर) येथे पंचायत समितीच्या उमेदवाराने दिलेल्या मटण व दारूच्या पार्टीने चार   कार्यकर्त्यांचा बळी घेतला असून, जवळपास आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यातील काही प्रकृती चिंताजनक असलेल्या कार्यकर्त्यांवर नगर शहर व जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.  

सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली. दिवसभर प्रचार करून थकलेल्या कार्यकर्त्यांसाठी ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे यांच्यासह पोलीस पथक नगरच्या शासकीय रुग्णालयात पोचले असून, तेथे तीन मृत्यू पावलेल्या कार्यकर्त्यांचे मृतदेह रात्री उशिरा आणण्यात आले होते.

रात्री सव्वा आकराच्या सुमारास त्यातील आणखी एकाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. चौथ्या कार्यकर्त्यांचा मृतदेह घेवून रूग्णवाहीका शासकीय रूग्णालयात आली होती. त्यामुळे या घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Party in the town of infection victims of alcohol in nagar