अक्कलकोट स्थानकावर प्रवाशांना करावा लागतोय अडचणींचा सामना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

अक्कलकोट - महाराष्ट्र व कर्नाटक या सीमावर्ती भागातील अक्कलकोट बसस्थानक आणि याद्वारे प्रवाशांना मिळणारी सेवा ही अनेक दृष्ट्या अडचणीचे ठरत आहे. प्रवासी नाईलाजने हा त्रास सहन करीत आहेत. तर, अनेक प्रवासी धोकादायक अवैध प्रवासी वाहतुकीकडे वळाले आहेत. यामुळे महामंडळाने या बाबीचा विचार करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी अशी मागणी होत आहे. 

महिनाभरापूर्वी अक्कलकोट येथील स्थानकप्रमुख संजय भोसले आणि आगार व्यवस्थापक विवेक हिप्पळगावकर यांची बदली झाली आहे. त्यानंतर या स्थानकावर त्याच दर्जाचे सक्षम अधिकारी नेमले नाहीत. यामुळे स्थानकावर आणि वाहतुकीत विस्कळितपणा आला आहे. तरी तातडीने या दोन्ही महत्वाच्या पदावर दर्जेदार अधिकारी नेमण्याची गरज आहे. अन्यथा सीमावर्ती स्थानकाचा विकास न होता. आहे तो त्रास पुन्हा वाढणार आहे. 

या परिस्थितीत अवैध प्रवाशी वाहतूक बळावणार आहे. अक्कलकोट ते रंगभवन मार्गावर रांग मार्ग आणि सावली नसल्याने प्रवाशी उन्हातच थांबतात त्यामुळे जेष्ठ नागरिकांसह सर्वांनाच याचा त्रास होत आहे. त्यामुळे स्थानकांवर रंगभवनसाठी सावलीसह स्वतंत्र रांग मार्ग आणि जेष्ठांना आसन व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे.

अक्कलकोट स्थानकावरील मुख्य अडचणी
अक्कलकोट आगारासाठी चालक आणि वाहक संख्या वाढविणे, भंगारातील बसेस रद्द करून नवीन बसचे आणण्याचे नियोजन करणे, प्रवाशांना पिण्यासाठी शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा व्यवस्था करणे, स्थानकावर प्रवाशी व कर्मचारीसाठी पार्कींग व्यवस्था निर्माण करणे, स्थानकाची रंगरंगोटी करणे, पावसाळ्यात गळणाऱ्या स्टँडची दुरुस्ती करणे, बसस्थानक आवाराचे नवीन डांबरीकरण करणे, संपूर्ण संरक्षक भिंत बांधून पूर्ण करणे, अवैध प्रवाशी वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सेवेचा दर्जा सुधारणे, प्रवाश्यांची गरज ओळखून ग्रामीण भागातील कालबाह्य पन्नास वर्षांपूर्वीचे जुने वेळापत्रक बदलून गरजेप्रमाणे नवीन वेळापत्रक तयार करणे आदी बाबींचा समावेश आहे.

Web Title: Passengers face problems at Akkalkot bus stand