रुग्णांनीच ठोकले टाळे 

Patients lock to the hospital
Patients lock to the hospital
Updated on

पाथर्डी : उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्ते व रुग्णांनी रुग्णालयाच्या मुख्य दरवाजाला टाळे ठोकले. दुपारी वैद्यकीय अधिकारी आल्यानंतर उपचार सुरळीत झाले. शुक्रवारी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या तपासणीसाठी एक वैद्यकीय अधिकारी नव्हते. येथील कार्यकर्ते अनिल हरेर, शनवाज शेख यांनी रुग्णालय प्रशासनाला विचारणा केली. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी रुग्णांच्या मदतीने रुग्णालयाला टाळे ठोकत निषेध व्यक्त केला. 

दुपारनंतर एक वैद्यकीय अधिकारी आले. त्यांनी रुग्णांची तपासणी केली. या वेळी अनिल हरेर म्हणाले, की तालुक्‍याच्या विविध भागांतून गोरगरीब रुग्ण येऊन बराच कालावधीपासून येथे थांबून आहेत. उपजिल्हा रुग्णालयाला कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळतच नाही. तात्पुरत्या स्वरूपाच्या नियुक्तीवर काम करतात.

बालकांची दोन दिवसांपासून तपासणी केली नाही. मातेला दिला जाणारा सकस आहार मिळत नाही. रुग्णाला दिला जाणारा आहाराचा ठेका रद्द करावा. दुपारी वैद्यकीय अधिकारी आल्यानंतर रुग्णांची तपासणी करण्यात आली. जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नवनाथ आव्हाड यांच्याशी संपर्क केला. मात्र, तो होऊ शकला नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jayant Patil BJP Entry sangli politics
Kavthemahankal youth missing canal accident
Miraj Kolhapur Jalna ST bus attack latest news
sparrow chick falls from nest
Marathi News Esakal
www.esakal.com