

Pawas Ratnagiri drowning incident Sangli family details
esakal
Ratnagiri Pawas beach accident news : पावस तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तीन मुले समुद्रात बुडाली. त्यापैकी एकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला तर दोघांना वाचवण्यात यश आले. श्रेयश सागर गोसावी (वय १३, सध्या रा. मेर्वी-मांडवकरवाडी, मुळ रा. तांदूळवाडी, वाळवा, सांगली) असे मृत मुलाचे नाव आहे. आपल्या दोन मुलांसह पुतण्याला बुडताना पाहून वडिलांनी जीवाची बाजी लावत दोघांना सुखरूप बाहेर काढले; मात्र श्रेयशला वाचवण्यात त्यांना अपयश आले.