esakal | बिले द्या अन्यथा काम बंद आंदोलन | Sangli
sakal

बोलून बातमी शोधा

बिले द्या अन्यथा काम बंद आंदोलन

बिले द्या अन्यथा काम बंद आंदोलन

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : राज्यातील कंत्राटदारांची गेले दीड वर्ष शासनाकडे कोट्यवधींची बिले थकीत आहेत. यामुळे ठेकेदार अडचणीत असून त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे. शासनाने दिवाळीपूर्वी जर बिले दिली नाहीत, तर पूर्णपणे काम बंद आंदोलन करण्याचा इशारा हॉटमिक्स कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब गुंजाटे यांनी दिला.

शासनाकडे बिले थकीत असल्याच्या निषेधार्थ आज कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सांगली विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य हॉटमिक्स कॉट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब गुंजाटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

हेही वाचा: Drugs Case: आर्यन खान, अरबाज मर्चंटला कारागृहात केलं क्वारंटाइन

श्री. गुंजाटे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामविकास विभागाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या दोन्ही खात्याअंतर्गत गेली दीड वर्षे कंत्राटदारांना बिले देण्यात आलेली नाहीत. मार्चमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी देऊन देयके अदा करण्यापूर्वीच कोविड लॉकडाऊनच्या कारणामुळे निधी परत घेतला. त्यामुळे करोडो रुपयाची देयके शासनाकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे कामगार, मजुरांचे पगार, बँकेचे हफ्ते, पुरवठादारांचे देणे थकीत आहे. त्यामुळे ठेकेदार मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. दिवाळीपूर्वी बिले दिली नाहीत तर कंत्राटदारांवर आत्महत्येची वेळ येणार आहे.

हेही वाचा: टाटाने बोली जिंकली, ५३ वर्षानंतर एअर इंडियाची घरवापसी

त्यामुळे शासनाने बिले दिली नाहीत तर राज्यातील खड्डे भरण्यासह सर्व काम पूर्ण बंद करू. २०१४ मध्ये सहा महिने काम बंद केले होते. तसेच यावेळीही करण्याचा इशारा श्री. गुंजाटे यांनी दिला.

यावेळी मिरज विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता पृथ्वीराज चव्हाण, सांगली विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र काटकर यांना निवेदन देण्यात आले.या वेळी संघटनेचे डी. एम. पवार, जयराम कुक्रेजा, राकेश गुणांनी, अनिल जाधव, प्रकाश भोसले, संपतराव पाटील, संजीव व्होरा, प्रशांत पाटील, सांगली सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे अध्यक्ष महावीर पाटील, सचिव हेमंत मोरे, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे एस. एफ. चौगुले, संजय पाटील, इंद्रजित साळुंखे व शासकीय कामे करणारे ठेकेदार बहुसंख्येने उपस्थित होते.

loading image
go to top