
सांगली : निमशहरी व ग्रामीण भागात वीज बिल भरणा सुलभ करणाऱ्या, तसेच छोट्या व्यावसायिकांना उत्पन्न मिळवून देणाऱ्या ‘महावितरण’च्या ‘महापॉवर-पे’ पेमेंट वॉलेटला प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर, साताऱ्यानंतर सांगली जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो. जिल्ह्यात १ लाख ६ हजार ६० ग्राहकांनी वॉलेटच्या माध्यमातून १६ कोटी १५ लाख रुपयांच्या वीज बिलांचा भरणा केला आहे. त्यात ७९ वॉलेटधारकांना ५ लाख ३० हजार रुपयांचे कमिशन देण्यात आले.