अल्पवयीन मुलांना गाडी देणाऱ्यांना दंड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

माढा (जि. सोलापूर) - अल्पवयीन मुलांच्या ताब्यात वाहन चालविण्यास दिल्याने तालुक्‍यातील सहा जणांना माढा न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. देवकर यांनी प्रत्येकी एक हजार रुपये दंड व कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा सुनावली आहे.

माढा तालुक्‍यातील उद्धव कुसमोडे, ज्ञानदेव देडे, समीर बागवान, विजयकुमार दोशी, सोमनाथ सातव, महादेव घुगे या अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास दिल्याने कुर्डुवाडी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध माढा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. वरील सहा जणांनी आरोप मान्य केले.

Web Title: Penalties for driving a child to minors crime