धनादेश न वठल्याप्रकरणी जामीनदारास दंड

हुकूम मुलाणी
बुधवार, 4 एप्रिल 2018

मंगळवेढा -  फौजदारी न्यायाधीश के.के.माने यांनी  थकीत कर्जापोटी बँकेला दिलेला धनादेश न वठल्याप्रकरणी जामीनदारास दंड व शिक्षा सुनावली.

मंगळवेढा -  फौजदारी न्यायाधीश के.के.माने यांनी  थकीत कर्जापोटी बँकेला दिलेला धनादेश न वठल्याप्रकरणी जामीनदारास दंड व शिक्षा सुनावली.

या प्रकरणाची सविस्तर हकीकत अशी की, येथील समता ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेकडून शिवाजी ज्योतीराम गाढवे यांनी दि 31/3/2015 रोजी एक लाख सत्तर हजाराचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या वसुलीपोटी जामीनदार समाधान शिवाजी गाढवे यांनी दि 30/6/2016 रोजी पतसंस्थेला दोन लाखाचा बँक ऑफ इंडीया मंगळवेढा शाखेचा धनादेश दिला होता. परंतु, ज्या खात्याचा धनादेश दिला, त्या खात्यात पैसे नसल्यामुळे धनादेश परत आला. त्यानंतर अ‍ॅड.व्ही.आर.माळी यांच्या वतीने नोटीस पाठवून सदरची रक्कम तातडीने जमा करण्याची सुचना देण्यात आली. याला प्रतिसाद न दिल्याने जामीनदाराविरोधात संस्थेने न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला. 

सदरच्या खटल्याची सुनावणी फौजदारी न्यायाधिश के.के.माने यांच्यासमोर झाला. आरोपी जामीनदार समाधान गाढवेला एक महिना कैद व दोन लाख पन्नास हजाराचा दंड व संस्थेला दोन लाख चाळीस हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायलयाने दिले. दंडाची रक्कम न भरल्यास पंधरा दिवस जादा कैदेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात संस्थेच्या वतीने अ‍ॅड.व्ही. आर.माळी यांनी काम पाहिले.

Web Title: Penalty for bail in case of non-payment of check