कोल्हापूरः पेंढारवाडीला उपसरपंचाची मोटरसायकल जाळली

कोल्हापूरः पेंढारवाडीला उपसरपंचाची मोटरसायकल जाळली

उतूर - पेंढारवाडी( ता. आजरा ) येथे उपसरपंच एकनाथ दत्तात्रय आजगेकर यांची घरासमोर लावलेली मोटरसायकल ( MHO9 DD 3241) अनोळखी व्यक्तीने रात्री पेट्रोल टाकून जाळली. याबाबत अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

आजगेकर यांचे गावच्या उत्तरेस एका बाजूला घर आहे. याठिकाणी दारात मोटरसायकल लावून आजगेकर झोपी गेले. अनोळखी व्यक्तीने रात्री त्यांच्या घरासमोर येवून गाडीवर प्लास्टिक बाटलीतून आणलेले पेट्रोल ओतून पेटवून दिले. तसेच त्याने हे कृत्य करण्याआधी स्वतःची ओळख पटू नये म्हणून गावातील रस्त्यावरील दिवे बंद केले होते. यासाठी त्यांनी खांबावरील फ्युज काढून ठेवल्या होत्या. हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीचे लाल रंगाचे चप्पल व पेट्रोलच्या रिकाम्या बाटल्या घटनास्थळी सापडल्या आहेत.

ही घटना समजताच आजरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे घटनास्थळी दाखल झाले. त्यानी पोलीसांना तपासाबाबत सुचना दिल्या. गावातील नागरिकांना शांत राहून सहकार्य करण्याचे आवहान केले. राजकिय घटनेतून किंवा अन्य कुठल्या वादातून ही घटना घडली आहे का याचा शोध पोलिस घेत आहेत. या घटनेतील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम पोलीस करीत आहेत. याप्रकरणी काही युवकांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी केल्याचे समजते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com