मंगळवेढेकरांनी केली पूरग्रस्तांना मदत

हुकूम मुलाणी 
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी दुष्काळी मंगळवेढा तालुक्यातील वारी परिवार, माजी सैनिक संघटना, आणि व्यापारी असोशियन यांच्यावतीने  शहरातून फेरी काढून पुरग्रस्तांना मदत म्हणून दहा हजार पोळ्या,पाच हजार भाकरी, शंभर बिस्कीट बॉक्स, पन्नास पाणी बॉक्स जमा करून रवाना करण्यात आले.

मंगळवेढा : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी दुष्काळी मंगळवेढा तालुक्यातील वारी परिवार, माजी सैनिक संघटना, आणि व्यापारी असोशियन यांच्यावतीने  शहरातून फेरी काढून पुरग्रस्तांना मदत म्हणून दहा हजार पोळ्या,पाच हजार भाकरी, शंभर बिस्कीट बॉक्स, पन्नास पाणी बॉक्स जमा करून रवाना करण्यात आले.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाने आलेल्या पुराची माहिती सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक माध्यम, वर्तमानपत्रांमधून समजत असल्यामुळे यातील भयानक परिस्थितीत  माणुसकीच्या आधाराची गरज ओळखली. आणि सध्या तालुक्यामध्ये दुष्काळाची भीषण तीव्रता असताना देखील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांवर ओढवलेल्या संकट प्रसंगी मदत करण्याची भावना शहरवासीयात जागृत झाली आहे.

यामध्ये व्यापारी असोसिएशन, वारी माजी सैनिक संघटना, शहरातील विविध सामाजिक संस्था, पतसंस्था , दुकानदार आणि दानशूर व्यक्तींकडून बिस्किटे,पाण्याच्या बाटल्या, भाकरी, पोळ्या गोळा करण्यात आल्या. तर शहरात असणाऱ्या फळविक्रेते  बागवान यांनी केळी दिली. यावेळी अजित जगताप, सतीश दत्तू, बशीर बागवान,प्रवीण खवतोडे आदीसह वारी परिवार, माजी सैनिक संघटना आणि व्यापारी असोशियन सदस्य उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people of mangalwedha village help flood survivors