लोक म्हणतात, 'मी नौटंकी करतो,स्टाईल इज स्टाईल' : उदयनराजे (व्हिडीओ)

SATARA.jpg
SATARA.jpg

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (शनिवार) सातारकरांच्या प्रेमाला साद घालत 'तेरे बिना जिया जाये ना'...हे गाणे गुणगुणले. दरम्यान लोक म्हणतात, ''मी नौटंकी करतो. कोणी काही म्हणो, 'स्टाईल इज स्टाईल' असे म्हणत उदयनराजेंनी कॉलर उडवली.

सदरबाझर येथील राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले उद्यानाचे नूतनीकरण केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून करण्यात आले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा आज (शनिवार) खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाला. त्यावेळी नगरादयक्ष माधवी कदम, उपादयक्ष सुहास राजेशिर्के, नगरसेवक निशांत पाटील, नगरसेविका रजनी जेधे यांच्यासह नगरसेविका, नगरसेविका तसेच नागरिक उपस्तिथ होते.

यावेळी खासदार उदयनराजे यांनी ''सातारकरांच्या आरोग्यदायी जीवनासाठी विविध उद्यानांची निर्मिती करीत आहोत, नूतनीकरण करीत आहोत. तुमची साथ लाभत असल्यानेच सुरु असलेले विकासकामे करणे शक्य होत आहे. जे काही करीत नाहीत ते नुसते ठो ठो बोंबलत आहेत. आम्ही करतो त्यामुळे आम्ही ठणकावून सांगतो आम्ही केलंय.'' असे सांगितले

'निशांत म्हणाला, महाराज तुमच्याकडे ठेवणीतील गाणी असतात, असे म्हणून उदयनराजे यांनी आकाशात पाहून 'तेरे बिना जिया जाये ना'...हे गाणे गुणगुणले आणि कडव्या नंतर सातारा हे शब्द उच्चारताच उपस्तीथांनी शिट्ट्या आणि टाळ्या वाजविल्या. अखेरीस उदयनराजें म्हणाले, काही जण म्हणतात मी नौटंकी करतो...कोणी काही म्हणो... स्टाईल इज स्टाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com