मंगळवेढा- ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांचे हाल

हुकूम मुलाणी  
रविवार, 15 एप्रिल 2018

मंगळवेढा- रात्रीच्या वेळीचे ढगाळ वातावरण आणि पाऊस, वाऱ्याचा संभव यामुळे तालुक्यातील रात्रीच्या वेळी तीन दिवसापासून विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने ऐन उन्हाळ्यात शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचे उकाड्यामुळे हाल होत असून याचा सर्वाधीक त्रास वयोवृद्ध व लहान बालकांना होत आहे.        

मंगळवेढा- रात्रीच्या वेळीचे ढगाळ वातावरण आणि पाऊस, वाऱ्याचा संभव यामुळे तालुक्यातील रात्रीच्या वेळी तीन दिवसापासून विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने ऐन उन्हाळ्यात शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचे उकाड्यामुळे हाल होत असून याचा सर्वाधीक त्रास वयोवृद्ध व लहान बालकांना होत आहे.        

शहर व ग्रामीण भागात सध्या कडक उन्हाळ्याचा त्रास होत आहे. तापमानाने चाळीसी पार केली आहे. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून झालेल्या चांगल्या कामामुळे पाण्याच्या पातळीत वाढ यामुळे यंदा पाण्यात टंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने शासनाच्या टँकरवर होणाऱ्या कोट्यावधी रूपयांची बचत झाली. याचे परिणाम चांगले दिसल्याने पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून तालुक्यात श्रमदानाला जोर आलाय. पण सध्या तालुक्यात कडक उन्हाळ्यामुळे तापमानात वाढ झाली दिवसा वयोवृद्ध व लहान मुले थंड पेये व सावलीचा आसरा घेवू शकतात पण रात्रीच्या वेळी खंडीत वीजपुरवठ्यामुळे मात्र घामाघूम होवून मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.  

मंगळवेढा,हुन्नुर,निंबोणी,नंदेश्वर,आंधळगाव,बोराळे,हुलजंती,मारापूर,बठाण,ब्रह्मपुरी,खोमनाळ, सलगर बु. या 33 के .व्ही केंद्रातुन वीजपुरवठा केला जातो. एखाद्या केंद्रात बिघाड सर्वच केंद्रे बंद ठेवली जातात. वातावरणातील बदलामुळे संध्याकाळीचे वातावरण ढगाळ होत असून वारे सुटण्याच्या आधीच विद्युत पुरवठा खंडीत केला जात असून याबाबत विचारणा केली असता मंगळवेढ्यावरून बंद असल्याचे तर कधी इथून चालू आहे तुमच्या वायरमनला विचारा असे सांगून वेळ मारून नेली जात आहे. काही वेळा वायरमनाचे फोन ही बंद असतात वास्तविक पाहता यावेळी भगीरथ बंद असते. शेती फिडर चालू असतो याचा अनुभव निंबोणी सबस्टेशन वीज ग्राहकाला येत आहे. गावे जास्त असल्याने विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. महावितरण कंपनी मार्च मध्ये बिलाची वसुली करताना घरगुती वापराची जादा बिले आगाऊ भरून घेतली पण ऐन उन्हाळ्यात विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याऐवजी रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा खंडीतह होत असल्याने नागरिक घामाघूम होत आहे.

Web Title: people suffer due to electricity issue